शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
3
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
4
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
5
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
6
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
7
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
8
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
9
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
10
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
11
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
12
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
13
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
14
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
15
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
16
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
17
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
18
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
19
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक निवडणूकपूर्व अवैध बांधकामामुळे अपात्र ठरतो का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:21 IST

नागपूर : नगरसेवकाला अपात्र ठरविण्यासाठी त्याने निवडणुकीपूर्वी केलेल्या अनधिकृत बांधकामाचा विचार केला जाऊ शकतो का? असा प्रश्न मुंबई उच्च ...

नागपूर : नगरसेवकाला अपात्र ठरविण्यासाठी त्याने निवडणुकीपूर्वी केलेल्या अनधिकृत बांधकामाचा विचार केला जाऊ शकतो का? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील द्विसदस्यीयपीठाने निर्धारित केला आहे. हा प्रश्न योग्य खुलासा होण्यासाठी तीन सदस्यीय पूर्णपीठाकडे पाठविण्यात आला आहे.

यासह आणखी दोन प्रश्न पूर्णपीठाकडे पाठविण्यात आले आहेत. एखाद्या नगरसेवकाने निवडून आल्यानंतर किंवा त्यापूर्वी नवीन मालमत्ता संपादित केली असेल आणि त्या मालमत्तेत आधीच अनधिकृत बांधकाम केले गेले असेल, तर त्या अनधिकृत बांधकामाच्या आधारेदेखील नगरसेवकाला अपात्र ठरवले जाऊ शकते का? हा न्यायालयाचा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न महानगरपालिका आयुक्तांच्या अधिकाराशी संबंधित आहे. महानगरपालिका आयुक्त हे नगरसेवकाच्या अपात्रतेचा संदर्भ स्वत: दिवाणी न्यायाधीशाकडे पाठवू शकतात की, त्यांनी संबंधित संदर्भ योग्य निर्णयासाठी मनपा सर्वसाधारण मंडळाकडे सादर करायला पाहिजे, असे या प्रश्नात नमूद करण्यात आले आहे. या मुद्यांविषयी एडविन ब्रिट्टो, मल्लेश शेट्टी यासह विविध प्रकरणातील निर्णयात न्यायालयाने वेगवेगळी भूमिका मांडली आहे. परिणामी, हे तीन प्रश्न योग्य खुलासा होण्यासाठी पूर्णपीठाकडे पाठविण्यात आले आहेत.

--------------

या प्रकरणात प्रश्न निश्चित

न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांनी तिलोत्तमा किनखेडे यांच्या याचिकेमध्ये सदर प्रश्न निश्चित केले. वॉर्ड १४-डी मधून प्रगती पाटील यांनी किनखेडे यांना हरवून विजय मिळविला. त्यानंतर किनखेडे यांनी पाटील यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावर आक्षेप घेऊन त्यांना अपात्र ठरविण्यासाठी ३ मे २०१७ रोजी महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रार केली. मनपा आयुक्तांना पाटील यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळून आल्यामुळे त्यांनी २ जुलै २०१९ रोजी हे प्रकरण योग्य निर्णयासाठी मनपाच्या सर्वसाधारण मंडळाकडे पाठविले. त्याविरुद्ध किनखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनपा आयुक्तांनी सदर प्रकरण स्वत: वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीशाकडे सादर करायला पाहिजे. हे प्रकरण सर्वसाधारण मंडळाकडे पाठविण्याची गरज नाही, असे किनखेडे यांचे म्हणणे आहे.