शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीनगरात तोफखाना चौक माहिती आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:51 IST

विस्मृतीत गेली ओळख : महापालिकेने सेनेतील शूर तोफजींच्या स्मृतीत उभारले होते स्मारक मंगेश व्यवहारे नागपूर : लक्ष्मीनगरातील आठरस्ता चौकाची ...

विस्मृतीत गेली ओळख : महापालिकेने सेनेतील शूर तोफजींच्या स्मृतीत उभारले होते स्मारक

मंगेश व्यवहारे

नागपूर : लक्ष्मीनगरातील आठरस्ता चौकाची अख्ख्या नागपुरात ओळख आहे. याच चौकाची नोंदणीकृत ओळख ही तोफखाना चौक अशी होती. महापालिकेने सेनेतील शूर तोफजींच्या स्मृतीत हे स्मारक उभारले होते. पण आज तोफखाना चौकाची ओळख विस्मृतीस गेली आहे. लक्ष्मीनगर परिसरात अनेकांना तोफखाना चौक कुठे आहे? हे विचारल्यावर पहिल्यांदाच ऐकतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आठरस्ता चौकाच्या मधोमध एक स्तंभ उभारला आहे. या स्तंभावर तोफ लावण्यात आली आहे. स्तंभावर सेनेचे लोगोही आहे. स्तंभाच्या भोवताली कारंजे लावले आहेत. २० ऑक्टोबर १९८७ मध्ये महापालिकेच्या वतीने या स्तंभाचे लोकार्पण तत्कालीन खासदार बनवारीलाल पुरोहित यांच्याहस्ते झाले. तत्कालीन महापौर पांडुरंग हिवरकर व उपमहापौर पांडुरंग कापसे, विरोधी पक्षनेते अर्जुनदास कुकरेजा यावेळी उपस्थित होते. मात्र हा चौक तोफखाना चौक नावाने ओळखलाच गेला नाही. चौकाच्या सभोवताली व्यवसाय करणाऱ्यांना या चौकाबद्दल विचारले असता, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. परिसरातील काही लोकांनी असा चौक लक्ष्मीनगरात नसल्याचेच सांगितले.

आठरस्ता चौकातील ऑटोस्टॅण्डवरून एक ऑटोचालक २५ वर्षापासून ऑटो चालवित आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मीनगरात एनसीसीचे कार्यालय होते. त्या कार्यालयाच्या माध्यमातून व मनपाच्या सहकार्याने तोफखाना चौक विकसित करण्यात आला होता. आज या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. कारंजे बंद पडले आहेत. लाईट फुटले आहे. टाईल्स तुटलेल्या आहेत. पालापाचोळ्यांचा कचरा स्तंभाजवळ साचला आहे. स्तंभासमोर एक ध्वजखांब उभारलेला आहे. कधीतरी तिथे ध्वजारोहण होते, असे सांगण्यात आले.

मुळात शहिदांच्या नावाने उभारलेले स्मारक हे त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी, नवीन पिढीला सेनेबद्दल जिव्हाळा निर्माण करण्यासाठी उभारले जातात. अशा स्मारकांची, स्तंभांची ओळख विस्मृतीत जात असेल तर ती शोकांतिका आहे.

- शहिदांच्या नावाने हुतात्मा स्मारक, अमर जवान स्मारक उभारले गेले आहे. स्थानिक प्रशासन जर त्यासाठी जागा उपलब्ध करून देत असेल तर त्याची जबाबदारीसुद्धा घेणे महत्त्वाचे आहे. असे होत नाही म्हणून आम्ही पूर्व सैनिकांनी अमर जवान स्मारक समिती उभारली आहे. या स्मारकांच्या पालकत्वाची जबाबदारी आम्ही घेण्यास तयार आहोत.

राम कोरके, माजी सैनिक