शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘सोनोग्राफी’साठी डॉक्टरच मिळेना

By admin | Updated: May 6, 2015 02:09 IST

सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात ‘अल्ट्रा सोनोग्राफी’चे मशीन आहे, परंतु ते चालविण्यासाठी रेडिओलॉजिस्टच नाही.

नागपूर : सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद रुग्णालयात ‘अल्ट्रा सोनोग्राफी’चे मशीन आहे, परंतु ते चालविण्यासाठी रेडिओलॉजिस्टच नाही. ५०० रुपयाच्या मानधनावर काम करायला कुणी तयार नाहीत. परिणामी, रुग्णांना पदरमोड करून बाहेरून सोनोग्राफी करावी लागत आहे. विशेष म्हणजे, रुग्णालय प्रशासन गेल्या अनेक वर्षांपासून शासनाला रेडिओलॉजिस्टसह पॅथालॉजिस्ट व भूलतज्ज्ञाच्या पद भरतीची मागणी करीत आहे, परंतु शासन प्रस्ताव पाठवा म्हणण्यापलिकडे उपाययोजना करीत नसल्याची धक्कादायक माहिती आहे. चांगले आरोग्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु शासनाच्या उदासीनतेचा फटका आयुर्वेद रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना बसत आहे. दर तीन वर्षानंतर शासनाने आढावा बैठक घेऊन रुग्णालयातील आवश्यक पदांना मंजुरी देण्याचा नियम असताना गेल्या आठ वर्षांपासून बैठकच झालेली नाही. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, २००७ मध्ये तब्बल २५ वर्षानंतर आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी मंजूर झालेला पदांवरच रुग्णालयाचा कारभार आजही सुरू आहे. गेल्या आठ वर्षांपासून रुग्णालय प्रशासन बैठकीच्या प्रतीक्षेत आहे, परंतु शासन याला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट हे पद नाही. परंतु ‘अल्ट्रा सोनोग्राफी’ यंत्र आहे. हे चालविण्यासाठी रेडिओलॉजिस्ट असावा, असा शासनाचा नियम आहे. गेल्या काही महिन्यांपासून एक रेडिओलॉजिस्ट सेवाभाव म्हणून ५०० रुपये मानधनावर यायचा. परंतु एवढ्या कमी मानधनावर त्यांचा येण्या-जाण्याचा खर्चही निघत नसल्याने येणे बंद केले. यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून यंत्र बंद आहे. या मानधनावर दुसरे रेडिओलॉजिस्ट यायला तयार नाहीत. यातच ‘अल्ट्रा सोनोग्राफी’ मशीन सहा महिन्यांपूर्वीच ‘आऊटडेटेड’ झाल्याची माहिती आहे. परिणामी, रुग्ण अडचणीत आले आहेत.(प्रतिनिधी)