प्लॉटधारक आणि बिल्डरमधील वाद टोकाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:12 IST2021-08-21T04:12:46+5:302021-08-21T04:12:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - वाद टोकाला गेल्यानंतर बिल्डरने प्लॉटधारकारवर गैरकायद्याची मंडळी जमवून फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसांकडे ...

The dispute between the plot holder and the builder came to an end | प्लॉटधारक आणि बिल्डरमधील वाद टोकाला

प्लॉटधारक आणि बिल्डरमधील वाद टोकाला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - वाद टोकाला गेल्यानंतर बिल्डरने प्लॉटधारकारवर गैरकायद्याची मंडळी जमवून फ्लॅट बळकावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदवली. गिट्टीखदानमधील ही घटना असून चिराग संजय भूत (वय ३३) असे तक्रारदार बिल्डरचे नाव आहे.

भूत यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी फ्रेण्डस कॉलनीतील उदापूरकर परिवाराच्या मालकीचा प्लॉट काही वर्षांपूर्वी विकत घेतला होता. त्यावेळी येथे बहुमजली इमारत उभारण्याचे ठरवून त्यातील दोन फ्लॅट तसेच रोख रक्कम देण्याचे ठरले होते. भूत यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी उदापूरकर यांच्याशी कराराप्रमाणे व्यवहार केला. तरीसुद्धा आणखी एक फ्लॅट मिळावा म्हणून उदापूरकर यांनी कुरबूर चालवली आहे. या पार्श्वभूमीवर, १२ ऑगस्टच्या रात्री आरोपी रमेश उदापूरकर , राजन उदापूरकर, राहुल तसेच त्यांच्या कुटुंबातील दोन महिला यांनी ४०२ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. येथे त्यांना चाैकीदार अनिल तिवारीने विरोध केला म्हणून आरोपींनी तिवारीला मारहाण केली. भूत यांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर गिट्टीखदान पोलिसांनी गुरुवारी रात्री उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.

----

Web Title: The dispute between the plot holder and the builder came to an end