उपअभियंत्याच्या कक्षात तोडफोड

By Admin | Updated: June 11, 2014 01:36 IST2014-06-11T01:36:36+5:302014-06-11T01:36:36+5:30

मोमीनपुरा भागातील नादुरुस्त सिवर लाईनवरून मंगळवारी नगरसेविकेचे पती व गांधीबाग झोनचे उपअभियंता यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. वाद वाढल्याने धक्काबुक्की करून कार्यालयात तोडफोड केल्याचा

Disbanding in sub-division | उपअभियंत्याच्या कक्षात तोडफोड

उपअभियंत्याच्या कक्षात तोडफोड

धक्काबुक्की : एकमेकांच्या विरोधात पोलिसात तक्र ार
नागपूर : मोमीनपुरा भागातील नादुरुस्त सिवर लाईनवरून मंगळवारी नगरसेविकेचे पती व गांधीबाग झोनचे उपअभियंता यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. वाद वाढल्याने धक्काबुक्की करून कार्यालयात तोडफोड केल्याचा आरोप उपअभियंता अरुण मोगलेकर यांनी केला आहे.
महाल येथील गांधीबाग झोन कार्यालयात मोमीनपुरा प्रभागाच्या नगरसेविक ा अशरफू इफ्तीखार यांचे पती इफ्तीखार दुपारी १२.३० च्या सुमारास उपअभियंता मोगलेकर यांच्या कार्यालयात आले. त्यांनी सिवर लाईनच्या कामावरून जाब विचारत शिवीगाळ सुरू केली. यावरून दोघातील वाद वाढला. इफ्तीखार यांनी धक्काबुक्की करून कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड केली.

गोंधळामुळे अधिकारी व कर्मचारी आल्याने पुढील अनर्थ टळल्याची माहिती मोगलेकर यांनी दिली.हंसापुरी प्रभागातील सिवर लाईन जुनी झाली आहे. दुरुस्तीसाठी कंत्राटदार मिळत नसल्याने काम रखडले आहे. यामुळे या भागातील नागरिक त्रस्त आहेत. परंतु सामोपचाराने यावर तोडगा न काढता मारहाण व तोडफोड करण्याचा प्रयत्न योग्य नाही. इफ्तीखार यांच्याविरोधात कोतवाली पोलिसात तक्र ार दाखल केल्याची माहिती मोगलेकर यांनी दिली. दुसरीकडे अधिकारी धमक्या देत असल्याचा आरोप करीत इफ्तीखार यांनी मोगलेकर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. गेल्या दोन महिन्यापासून सिवर लाईन दुरुस्तीची वारंवार मागणी करीत आहे. परंतु अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्रस्त नागरिक नगरसेवकांना जाब विचारतात. याला अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप इफ्तीखार यांनी केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Disbanding in sub-division