शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

'नोटा'वरून सेव्ह मेरिट सेव्ह नेशनमध्ये फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:00 IST

सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही शैक्षणिक चळवळ असून, विविध जातीधर्मातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शिक्षणात आरक्षण मिळावे, यासाठी ही चळवळ सुरू केली आहे. त्याचा राजकारणाशी किंवा कुठल्याही निवडणुकीशी संबंध नाही, असे स्पष्टीकरण या चळवळीत सहभागी झालेल्या काही संघटनांनी दिले आहे.

ठळक मुद्दे‘नोटा’चा वापर करू नका : विवेकाने मतदान करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सेव्ह मेरिट सेव्ह नेशन ही शैक्षणिक चळवळ असून, विविध जातीधर्मातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शिक्षणात आरक्षण मिळावे, यासाठी ही चळवळ सुरू केली आहे. त्याचा राजकारणाशी किंवा कुठल्याही निवडणुकीशी संबंध नाही, असे स्पष्टीकरण या चळवळीत सहभागी झालेल्या काही संघटनांनी दिले आहे.दरम्यान, याच चळवळीतील सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्दड यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून विधानसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला मतदान न करता नोटाचा वापर करण्याचे आवाहन केले होते. परंतु त्यांचे हे आवाहन धुडकावीत याच चळवळीतील काही संघटनांनी लद्दड यांच्या आवाहनाला विरोध केला आहे. डॉ. संजय देशपांडे, सचिन पोशट्टीवार, अनुप मरार, अविनाश साहू, रॉय थॉमस यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. लद्दड यांच्या या फतव्याशी आमचा कुठलाही संबंध नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे. निवडणुकीत मतदाराला मतदान करण्याचा हक्क आहे. मग त्याने कुठल्याही पक्षाला केले तरी चालेल. मात्र सरसकट नोटाचा वापर करा, असे म्हणणे हे केवळ चुकीचेच नसून शैक्षणिक चळवळीला राजकारणाच्या दावणीला बांधण्याचा हा प्रकार आहे.दरम्यान, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये नोटाचा वापर न करता सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करावे आणि लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहनही या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.या चळवळीचा राजकारणाशी किंवा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. या चळवळीत विविध जातीधर्मातील माणसे सहभागी आहेत. सरकारने आरक्षण देताना किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश देताना केवळ गुणवत्तेलाच प्राधान्य देण्यात यावे, यासाठी ही चळवळ सुरू केली आहे. मात्र काही जण या चळवळीचा उपयोग राजकीय अजेंडा म्हणूृन करीत आहेत. त्यामुळे आमच्या या भूमिकेला या संघटनेतील अनेकांनी पाठिंबा दिला आहे.सर्व संघटनांनी अशा कुठल्याही फतव्यांना बळी पडू नये, असे आवाहन करीत असताना या चळवळीच्या लेटरपॅड आणि लोगोचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019