शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘रोबोटिक्स’ पदविका अभ्यासक्रम

By admin | Updated: May 21, 2015 02:35 IST

उपराजधानीतील विद्यार्थ्यांना लवकरच ‘रोबोटिक्स’ विषयात शिक्षणाचे दरवाजे उघडणार आहेत.

नागपूर : उपराजधानीतील विद्यार्थ्यांना लवकरच ‘रोबोटिक्स’ विषयात शिक्षणाचे दरवाजे उघडणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ किंवा ‘व्हीएनआयटी’ येथे लवकरच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यासंबंधात मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. नागपूर विद्यापीठातील शिक्षणतज्ज्ञ व बंगळुरू येथील ‘एबीबी’ कंपनीच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. जगभरात ‘रोबोटिक्स’चे वाढते महत्त्व लक्षात घेऊन नागपुरातदेखील ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञानाचे संशोधन केंद्र व त्यावर आधारित शैक्षणिक अभ्यासक्रम उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व ‘व्हीएनआयटी’च्या अधिकाऱ्यांशी मंगळवारी नागपुरात चर्चा केली होती. बंगळुरु येथील ‘एबीबी’ (एशिया ब्राऊन बोवरी) या कंपनीकडून शहरात ‘रोबोटिक्स’ तंत्रज्ञानाचे संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना अपेक्षित असलेल्या अभ्यासक्रमाबाबत सादरीकरण केले. यावेळी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, ‘व्हीएनआयटी’च्या संचालकीय मंडळाचे अध्यक्ष विश्राम जामदार, नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.डी.के.अग्रवाल हेदेखील उपस्थित होते. संबंधित अभ्यासक्रम ‘व्हीएनआयटी’ व नागपूर विद्यापीठात राबविण्यात येऊ शकतात काय याची चाचपणी यावेळी करण्यात आली. सोबतच या बैठकीत विविध मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अभ्यासक्रम तयार झाल्यानंतर तो नेमका कुठे राबवावा याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)