शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

धुळेच्या ‘बीओई’ने ‘ते’ १२ लाख परत केले

By admin | Updated: June 12, 2014 01:03 IST

तहसील कार्यालयाकडे असलेल्या बॅक आॅफ इंडियाच्या धनादेश पुस्तिकेचा क्रमांक मिळवून त्याच क्रमांकाच्या बनावट चेक बुकचा आधार घेत तीन धनादेशाच्या माध्यमातून सेलू तहसीलच्या बँक खात्यातून

बनावट धनादेश प्रकरण : उच्च स्तरावर चौकशी
सेलू : तहसील कार्यालयाकडे असलेल्या बॅक आॅफ इंडियाच्या धनादेश पुस्तिकेचा क्रमांक मिळवून त्याच क्रमांकाच्या बनावट चेक बुकचा आधार घेत तीन धनादेशाच्या माध्यमातून सेलू तहसीलच्या बँक खात्यातून नरेश सी. चैनानी या नावाने ११ लाख ९० हजार ७६० रुपयांची परस्पर उचल केल्या गेली. या प्रकरणाने संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धुळे येथील बँक आॅफ इंडियाने ही रक्कम सेलू तहसील कार्यालयाला परत केली आहे.
तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर यांच्या फिर्यादीवरुन सेलू पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. धुळे बँकेच्या पत्रात सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. मात्र ही अफरातफर सिद्ध होत नसल्याची पुष्टी जोडत चौकशीत ही अफरातफर सिद्ध न झाल्यास सदर रक्कम बँकेला परत करण्याची तसदी घेण्याची बाब नमूद करण्यात आली आहे. एकंदर बँकेच्या या पत्रानुसार रकमेची अफरातफर झालेली नाही, तर बँकेने ही रक्कम परत कशी काय केली,

असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. यावरुन बँकेच्या या नव्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
बँक म्हणते,अफरातफर नाहीसदर प्रकरणात तहसीलच्या खात्यातून बनावट धनादेशाद्वारे काढण्यात आलेली रक्कम धुळे येथील बँक आॅफ इंडियाने सेलू तहसील कार्यालयाच्या खात्यात जमा केली आहे. मात्र बँकेने चौकशीत अफरातफर झाली नसल्याचे नमूद केल्यामुळे मग ती रक्कम नेमकी कुठे गेली, असा सवालही उपस्थित होत आहे. बँकेकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याची बाबही बँकेच्या वरिष्ठ शाखा व्यवस्थापकांनी तहसीलला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.