शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विकलेल्या भूखंडाच्या विकासाचा सौदा अंगलट

By admin | Updated: December 23, 2016 01:52 IST

विकलेल्या भूखंडांच्या विकासाचा (डेव्हलपमेंट) बिल्डरसोबत सौदा करून भूखंडमालक आणि भूविकासकाची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह

बांधकाम ठरले वादग्रस्त : चौघांविरुद्धफसवणुकीचा गुन्हा दाखल नागपूर : विकलेल्या भूखंडांच्या विकासाचा (डेव्हलपमेंट) बिल्डरसोबत सौदा करून भूखंडमालक आणि भूविकासकाची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. क्रिष्णा गजभिये (महिला), प्रशांत गजभिये, सिद्धार्थ गजभिये आणि गौतम खोलूजी गजभिये (रा. वानाडोंगरी, मातोश्रीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांची एमआयडीसीतील मौजा वाघधरा येथे जमीन (खसरा क्रमांक १८/०४) आहे. या जमिनीतील एकूण ३२ हजार चौरस फुटाच्या जागेचा विकास करण्याचा उपरोक्त आरोपींनी ७३ लाखांमध्ये संदेश नारायण बुरबुरे यांच्यासोबत सौदा केला. त्यानुसार, बुरबुरेंनी नासुप्र तसेच अन्य ठिकाणी आवश्यक ती कागदपत्रे सादर करून आणि शुल्क भरून या जमिनीचा विकास केला. त्यावर बांधकामही केले. दरम्यान, ज्या भूखंडांवर हे बांधकाम करण्यात आले, ते भूखंड क्रमांक ८१ ते ८७ आपण उपरोक्त आरोपींकडून खरेदी केले असून, त्यापोटी ४५ लाख रुपये त्यांना दिले आहे, असा दावा करीत रेखाबाई जांभूळकर आणि अन्य काही जणांनी या बांधकामाला विरोध केला. त्यांनी सादर केलेली कागदपत्रेही खरी होती. त्यामुळे बांधकाम करणाऱ्या बुरबुरेंनी गजभिये परिवाराशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. प्रकरण वादग्रस्त ठरल्याचे लक्षात आल्यानंतर बुरबुरेंनी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. ठाणेदार सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार विजय नेमाडे यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर बुधवारी पीएसआय वानखेडे यांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला.(प्रतिनिधी) भूखंड कसे परत मिळणार...? जे भूखंड जांभूळकर आणि अन्य काहींच्या मालकीचे आहे, त्या भूखंडावर बांधकाम झाले आहे. हे बांधकाम बेकायदा ठरले आहे. त्यामुळे या बांधकामाचे काय होणार आणि ज्यांचे हे भूखंड आहे, त्यांना ते कसे परत मिळणार, असे प्रश्न संबंधितांमध्ये चर्चेला आले आहेत.