हुडकेश्वर-नरसाळ्यासाठी विकास योजना

By Admin | Updated: May 14, 2014 01:30 IST2014-05-14T00:48:30+5:302014-05-14T01:30:02+5:30

महापालिकेच्या सीमेत हुडकेश्वर व नरसाळा गावाचा समावेश करण्यात आला आहे. या क्षेत्रातील ९७२.८२ हेक्टरच्या विकासासाठी नवी योजना तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Development Plan for Hudkeshwar-Barnala | हुडकेश्वर-नरसाळ्यासाठी विकास योजना

हुडकेश्वर-नरसाळ्यासाठी विकास योजना

नागपूर : महापालिकेच्या सीमेत हुडकेश्‍वर व नरसाळा गावाचा समावेश करण्यात आला आहे. या क्षेत्रातील ९७२.८२ हेक्टरच्या विकासासाठी नवी योजना तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित प्रस्ताव २0 मे रोजी महापालिकेच्या सभेत मंजुरीसाठी ठेवला जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९९६ च्या कलम २१ ते ३0 अंतर्गत नव्या विकास योजनेला मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविले जाईल. कलम २३ अंतर्गत वाढीव क्षेत्रासाठी नवी विकास योजना तयार करणे आवश्यक आहे. याशिवाय जमीन उपयोग नकाशादेखील तयार केला जाईल. प्रारूप विकास योजना तयार करणे, प्रसारित करणो व सुनावणी घेणे यासाठी नियोजन समिती स्थापन करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना दिले जातील.

शहरातील गरीब रुग्णांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (एनयूएचएम) लागू केले आहे. या अंतर्गत शहरात ५0 प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच १0 कम्युनिटी सेंटर तयार करण्याची योजना आहे. यासाठी राज्य आरोग्य सोसायटी मुंबईशी महापालिकेने करार केला आहे. या कराराला महापालिका सभागृहात मंजुरी दिली जाईल. (प्रतिनिधी)

 

Web Title: Development Plan for Hudkeshwar-Barnala