शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त जिल्ह्याचा विकास थांबला

By admin | Updated: May 5, 2016 03:03 IST

नक्षलवाद ही देशाला लागलेली कीड आहे. महाराष्ट्रालगत असलेले राज्य नक्षलवादामुळे त्रस्त आहे.

नागपूर : नक्षलवाद ही देशाला लागलेली कीड आहे. महाराष्ट्रालगत असलेले राज्य नक्षलवादामुळे त्रस्त आहे. नक्षलवादाच्या संपूर्ण उच्चाटनासाठी सरकार विविध योजना राबवित आहेत. यात आरोग्य, शिक्षण आणि विकासात्मक मूलभूत सोई उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘स्पेशल अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला असून, त्याअंतर्गत अतिरिक्त निधी देण्यात येतो. परंतु गेल्या दीड वर्षापासून निधीच न मिळाल्याने नक्षलग्रस्त जिल्ह्याचा विकास थांबला आहे. नक्षलग्रस्त भागासाठी २०१०-११ पासून ‘स्पेशल अ‍ॅक्शन प्लॅन’ योजना सुरू करण्यात आली. यात विकासात्मक उपाययोजना करण्यासाठी निधी देण्याचे निश्चित करण्यात आले. सुरवातीला योजनेत महाराष्ट्रातील गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर २०१२-१३ मध्ये योजनेत बदल करून व्याप्ती वाढविण्यात आली. यात चंद्रपूर व भंडारा या दोन जिल्ह्यांचा नव्याने समावेश करण्यात आला. योजनेत नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी प्रती जिल्हा ३० कोटी रुपये देण्यात येते. यातून शिक्षण, आरोग्य, पाणी, बांधकाम, कृषी यासारख्या क्षेत्रावर हा निधी खर्च करण्यात येतो. शासनाच्या निकषाप्रमाणे यातील ७५ टक्के निधी अतिसंवेदनशील भागात खर्च करणे आवश्यक आहे. योजना आयोगात स्पेशल अ‍ॅक्शन प्लॅनचा समावेश होता. त्यामुळे निधी व जिल्ह्यांची व्याप्ती वाढविण्यात आली होती. परंतु केंद्र सरकारने योजना आयोग बरखास्त करून त्या ऐवजी नीती आयोग कार्यान्वित केला. नीती आयोगात नक्षलग्रस्त भागाच्या विकासात्मक उपाययोजनासाठी राबविण्यात आलेल्या स्पेशल अ‍ॅक्शन प्लॅनचा समावेश नसल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्ष २०१४-१५ ला २० कोटीचा पहिला हप्ता देण्यात आला. नंतर मात्र १० कोटीचा दुसरा हप्ता देण्यात आला नाही. २०१५-१६ मध्ये योजनेचा एकही रुपया मिळाला नाही. त्यामुळे येथील कामांवर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे अतिसंवेदनशील भागातील कामे रखडली आहेत. केंद्र शासन ही योजना गुंडाळणार असल्यामुळे निधी देण्यात आला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.(प्रतिनिधी)