शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विकास निधी वाटपात भेदभाव

By admin | Updated: March 13, 2016 03:26 IST

राज्य शासनाने जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींना विकास निधी दिल्याची घोषणा केली.

राजेंद्र मुळक यांचा आरोप : विकास कामांसाठी विशेष अनुदान नाहीनागपूर : राज्य शासनाने जिल्ह्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींना विकास निधी दिल्याची घोषणा केली. या निधीचे सर्व नगर परिषद व नगर पंचायतींना समान वाटप करायला हवे होते. मात्र, शासनाने तसे न करता, या निधी वाटपात भेदभाव केला असून, विकास कामांसाठी कोणत्याही प्रकारचे विशेष अनुदान जाहीर केले नाही, असा आरोप माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केला असून, निधी वाटपासाठी कोणता निकष लावण्यात आला, असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केला.राज्य शासनाने नगर परिषद व नगर पंचायती यांच्या क्षेत्रातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधीचे वाटप केले. यात काही निवडक नगर परिषदा व नगर पंचायतींना प्रत्येकी चार कोटी रुपयांचा निधी प्रदान करण्यात आला. दुसरीकडे, जिल्ह्यातील उमरेड, काटोल, वाडी, खापा, मोवाड, मोहपा नगर परिषद तसेच भिवापूर व कुही नगर पंचायतींना देण्यात आलेला निधी हा लाखात आहे. या नगर पंचायतींना देण्यात आलेल्या निधीची बेरीज केल्यास कोटीचा आकडा पार होत नाही, असा आरोप मुळक यांनी केला. उमरेड नगर परिषदेने नागरी स्वच्छता अभियानांतर्गत राज्यात तिसरा व हागणदारीमुक्त अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. ही बाब जिल्ह्यातील सर्वच नेत्यांसाठी अभिमानास्पद आहे. परंतु, निधी वाटपात याच नगर परिषदेला भोपळा मिळाला आहे. भोपळा मिळणाऱ्या नगर परिषदांमध्ये काटोल, वाडी, खापा, मोवाड, मोहपा तसेच भिवापूर व कुही नगर पंचायतींचा समावेश आहे. या सर्व शहरांमध्ये आघाडी सरकारच्या काळात देण्यात आलेल्या विकास निधीतून विविध विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युती सरकारने विकास कामांसाठी कोणत्याही प्रकारचे विशेष अनुदान दिले नाही. विकास निधी वाटपातील असमतोलामुळे सरकारच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप मुळक यांनी केला. या नगर परिषदांसोबत न्याय करण्याची मागणीही त्यांनी केली. (प्रतिनिधी)