शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

प्र्रलंबित विकास कामे मार्गी लावणार

By admin | Updated: July 22, 2014 00:54 IST

मौदा तालुक्यातील बाबदेव परिसरातील विविध गावांमधील प्रलंबित विकासकामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची ग्वाही आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

चंद्रशेखर बावनकुळे : बाबदेव परिसरात गाव संपर्क अभियाननागपूर : मौदा तालुक्यातील बाबदेव परिसरातील विविध गावांमधील प्रलंबित विकासकामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची ग्वाही आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.गाव संपर्क अभियानांतर्गत आ. बावनकुळे यांनी बाबदेव परिसरातील सिंगोरी, नरसाळा, कुंभापूर, बाबदेव, सावरगाव, चांदेमांगली, कोपरा, किरणापूर, नानादेवी, कुंभारी, इसापूर, रहाडी, डहाळी आदी गावांना भेटी देऊन येथील ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आ. बावनकुळे यांनी सांगितले की, पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत बाबदेव - कोपरा - चांदेमांगली - किरणापूर या मार्गासाठी २ कोटी ५० लाख रुपये तसेच पूरहानी योजनेंतर्गत नानादेवी - कोपरा मार्गाच्या दुरुस्तीसाठी २४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. नानादेवी अ‍ॅप्रोच पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असून, कुंभापूर या पूरग्रस्त गावाच्या विकासासाठी दोन कोटी ५० लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या भागातील कालवे, लघुकालवे, पाटसऱ्या, वितरिका, लघु वितरिका यांची दैनावस्था झाली आहे. जलसुधार योजनेंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतेही काम केले नाही. अवकाळी पाऊस गारपिटीची नुकसानभरपाई अद्यापही बँक खात्यात जमा करण्यात आली नाही, असे आरोप ग्रामस्थांनी यावेळी केले. कालवे व पांदण रस्ते, स्मशानभूमीची दुरवस्था, स्वस्त धान्य वितरणात येणाऱ्या अडचणी, श्रावणबाळ व निराधार योजनांच्या मध्यमातून मिळणारे अनुदान, जीवनदायी योजना, अन्न सुरक्षा योजना, खते व बियाण्यांची टंचाई व दरवाढ, भारनियमन, गावठाण पट्टे वाटप, सिंचन, रस्ते, घरकूल आदी संदर्भात ग्रामस्थांनी आ. बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या. या सर्व समस्या लवकरच निकाली काढण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी ग्रामस्थांनी दिली. यावेळी हरीश जैन, नरेश मोटघरे, हेमराज सावरकर, श्याम सावरकर, एकनाथ मदनकर, बेनिराम तिघरे, सुनीता पाराशर, कल्पना सावरकर, मंदा पंचवटे, ईश्वर भागलकर, राजू ईखार, कवडू सराटकर, बबलू चौधरी, किशोर ढोले, वीरेंद्र तायतोडे, सचिन मोटघरे, मिलिंद सोनटक्के, जितेंद्र बेहरे, सुधाकर बाभरे, सूर्यभान शेंबे, संजय नारनवरे, संजय डोंगरे, चंक्रधर बावणे, नाना डहारे, संजय वासनिक, गजेंद्र वाघमारे, राजेंद्र सोनटक्के, अशोक ठाकरे, बंडू सोनवणे, बापूराव केवट, दिनेश भोले, अमोल राऊत, अनिल वानखेडे, भोजराज बेहर, अजय शेंडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)