शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांचा राजीनामा!

By admin | Updated: February 12, 2016 03:27 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी स्थायी समितीचे नवीन अध्यक्ष व सदस्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे.

स्थायी समितीवर जाणार : बंडू राऊ त यांच्या नावाची आज घोषणानागपूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी स्थायी समितीचे नवीन अध्यक्ष व सदस्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. समितीवर सदस्य म्हणून वर्णी लागणार असल्याने उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांनी महापौर प्रवीण दटके यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याविषयी गुप्तता बाळगली जात असल्याने त्यांच्या राजीनाम्यामुळे उलटसुलट चर्चा आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून परिवहन समितीचे सभापती बंडू राऊ त यांचे नाव निश्चित झाले आहे. सभेत त्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. विद्यमान अध्यक्ष रमेश सिंगारे यांचा कार्यकाळ संपत असल्याने सभेत सिंगारे यांच्यासह निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या रिक्त जागांवर नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे.नागपूर विकास आघाडीच्या कोट्यातील स्थायी समितीचे पाच सदस्य निवृत्त होत आहेत. यात रमेश सिंगारे, नीता ठाकरे, विशाखा मैद, कांता रारोकार व किशोर डोरले आदींचा समावेश आहे. रिक्त होणाऱ्या जागांवर बंडू राऊ त, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, रामदास गुडधे, सरिता तिवारी व दिव्या घुरडे आदींचा समावेश आहे. परंतु रात्रभरात काही घडामोडी घडल्यास ऐनवेळी काही नावात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे कामील अंसारी यांनी स्थायी समितीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागेवर पक्षाचे गटनेते राजू नागुलवार तर काँग्रेसच्या आघाडीतील लोकमंचचे दीपक पटेल निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी इफ्तिखार अशरफू निशा यांची स्थायी समिती सदस्य म्हणून निवड केली जाणार आहे. (प्रतिनिधी)