शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्य योग्य उपचाराने बरा होणारा आजार : माधुरी थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:30 IST

‘नैराश्य’ हा वेळीच व योग्य उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांनी केले.

ठळक मुद्देआत्महत्या प्रतिबंधक दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाचा गरजा वाढत आहे यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर अशी व्यक्ती स्वत:साठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकेल किंवा आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकेल. ‘नैराश्य’ हा वेळीच व योग्य उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी थोरात यांनी केले.प्रादेशिक मनोरुग्णालयात मंगळवारी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. मंचावर डॉ. दीपक अवचट, डॉ. अभिषेक मार्मडे उपस्थित होते.डॉ. थोरात यांनी शासनातर्फे विविध मानसिक आजारावरील उपचार व केलेल्या सुविधांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या कोणत्याही भावनांविषयी तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत बोला. जेणेकरून तुमच्या भावनांना मोकळी वाट मिळेल. आपलं खाणं आणि आपल्या भावना यात एक प्रकारचे नाते असते. म्हणूनच नेहमी चांगले सकस अन्न सेवन करावे. मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत मन मोकळे करा. कार्यालयीन किंवा नेहमीच्या कामातून ‘ब्रेक’ घ्या. मग तो ब्रेक अगदी पाच मिनिटाचा का असेना, घरकामातून पाच मिनिटं शांत बसा. शनिवार-रविवार कुठेतरी फिरायला जाणे हा अतिशय चांगला ब्रेक ठरू शकतो. एखाद्या चांगल्या गोष्टीचा ‘छंद’ जोपासा. त्यात रमण्याचा प्रयत्न करा. त्यामुळेही तणावापासून काहीसे लांब राहता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यसनांपासून दूर राहा, असेही त्या म्हणाल्या. या प्रसंगी डॉ. अवचट व डॉ. मार्मडे यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.संचालन संध्या दुर्गे यांनी केले. आभार डॉ. अमोल चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाला १२० रुग्ण उपस्थित होते. हा कार्यक्रम आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. तायडे व उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयSuicideआत्महत्या