शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना डेंग्यूचा डंख

By admin | Updated: September 6, 2016 02:23 IST

पालकांनो सावधान. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने गेल्या दोन महिन्यात केलेल्या

३३ शाळेत डेंग्यू डासांच्या अळ्या : मनपाच्या पाहणीत आढळून आले वास्तवनागपूर : पालकांनो सावधान. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने गेल्या दोन महिन्यात केलेल्या शाळांच्या पाहणीत तब्बल ३३ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. शाळांमध्ये डेंग्यूची उत्पत्ती ही कूलर्स, पाण्याच्या टाक्या, कुंड्या, ड्रममधून होत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, डेंग्यूचा डास दिवसा चावत असल्याने आणि याचवेळी विद्यार्थी शाळेत रहात असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी डेंग्यू रुग्णांची संख्या कमी आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने केलेल्या जनजागृतीमुळे हे शक्य झाले झाले आहे. गेल्या वर्षी २३० रुग्ण आढळून आले होते. यावर्षी आतापर्यंत ५६ रुग्ण आढळून आले आहेत. परंतु शाळांमध्ये डासांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना होतच नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र आहे. यावर्षी शाळा सुरू झाल्यापासून मनपाच्यावतीने शाळांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यात ३३ शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या. गेल्या काही वर्षांपासून शाळा-शाळांमध्ये जाऊन डेंग्यू डासांची माहिती दिली जात आहे. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यानंतरही केलेल्या पाहणीत शाळांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येत आहे. हे धक्कादायक आहे. शाळा प्रशासनाने याविषयी गंभीर होणे आवश्यक आहे. -डॉ. जयश्री थोटे अधिकारी, हिवताप व हत्तीरोग विभाग मनपा