शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या दफ्तरशाहीमुळे वाढीव दराने मिळाली डिमांड !

By admin | Updated: June 1, 2015 02:47 IST

नासुप्रकडे भूखंडांच्या नियमितीकरणासाठी अर्ज केला. सुरुवातीला इमारत अभियंत्याने प्रचलित दर २२.३० रुपये प्रती चौरस फुटानुसार डिमांड नोट देण्यास मंजुरी दिली.

नासुप्रचा अजब कारभार : भूखंडाचे नियमितीकरण रखडलेकमलेश वानखेडे नागपूरनासुप्रकडे भूखंडांच्या नियमितीकरणासाठी अर्ज केला. सुरुवातीला इमारत अभियंत्याने प्रचलित दर २२.३० रुपये प्रती चौरस फुटानुसार डिमांड नोट देण्यास मंजुरी दिली. नंतर मात्र, वाढीव दरांचा ठराव झाल्याचे कारण देत वाढीव दराने डिमांड दिली. आता गुंता सोडवावा व जुन्या दराने डिमांड मिळावी या मागणीसाठी उपरे ले-आऊट येथील रहिवासी मारोतराव धांडे नासुप्रच्या चकरा मारत आहेत. मात्र, त्यांना न्याय मिळेनासा झाला आहे. आपल्या या प्रश्नाची आता मुख्यमंत्रीच दखल घेऊन न्याय देतील, अशी त्यांना आशा आहे.मौजा परसोडी खसरा क्रमांक १७/१-२ मधील भूखंड क्रमांक २२ (१२५० चौरस फूट) हा मारोतराव धांडे यांच्या दोन मुलांच्या नावाने आहे. संबंधित भूखंड कोणत्याही आरक्षणात नाही. २००५ पासून ते घर बांधून तेथे वास्तव्यास आहेत. ले-आऊट धारकांनी १ डिसेंबर १९९९ रोजी ताबापत्रही दिले असून २० मे २००४ रोजी रजिस्ट्री झाली आहे. १८ आॅक्टोबर २००७ रोजी धांडे यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावाने नासुप्रमध्ये भूखंड नियमितीकरणासाठी अर्ज केला होता. त्यावेळी ले-आऊट धारकांनीही नियमितीकरणासाठी अर्ज केला होता. त्यामुळे नासुप्रने कोणताही एक अर्ज निरस्त करण्यासाठी १०० रुपयांच्या कोर्ट फी स्टॅम्प पेपरवर नाहरकत प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले होते. त्यावेळी धांडे यांनी पूर्व विभागाचे तत्कालिन अभियंता बाबडे यांच्याकडे नाहरकत प्रमाणपत्र सादर केले होते. संबंधित स्टॅम्प पेपर भूखंड क्रमांक २२ च्या फाईलमध्ये लावून ठेवण्यात आला होता. दिरंगाईचा फटका नागरिकांना का ?संबंधित प्रकरणात नासुप्रच्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली. धांडे यांनी सादर केलेला स्टॅम्प पेपर १० एप्रिल २०१३ पासून ते जुलै २०१४ पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना कसा दिसला नाही, जानेवारी २०१४ पासून पुढील तब्बल सहा महिने या प्रकरणाची समरी का तयार करण्यात आली नाही, दिरंगाई करण्यामागे नेमका काय हेतू होता, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अधिकाऱ्यांनी वेळेत पाठपुरावा केला नसता तर धांडे यांना भूखंड नियमित करण्यासाठी वाढीव दराच्या ठरावाचे बंधन आले नसते. या एकूणच दिरंगाईची नासुप्र सभापतींची चौकशी करण्याची गरज आहे. नासुप्रकडून न्याय न मिळाल्याने आता धांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित तक्रार अर्ज दाखल केला असून मुख्यमंत्रीच आपल्याला न्याय देतील व दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करतील, अशी त्यांना आशा आहे.