शहरं
Join us  
Trending Stories
1
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
2
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
3
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
4
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
5
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
6
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
7
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
8
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
9
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
10
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
11
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
12
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
13
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
14
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
15
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
16
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
17
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
18
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
19
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
Ola Electric ची मोठी घोषणा; करणार २ हजार कोटींची गुंतवणूक, काय आहे कंपनीचा प्लॅन? 
Daily Top 2Weekly Top 5

जातीला आहुती, विकासाला पावती नागपूर ठरले खरे सेक्युलर

By admin | Updated: May 18, 2014 00:48 IST

गेली २० वर्षे नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा बोलबाला राहिला. दलित, मुस्लिम, ओबीसी बहुल मतदार असलेल्या नागपूरने नेहमी काँग्रेसला साथ दिली.

सारे फॅक्टर झाले फॅ्रक्चर

कमलेश वानखेडे - नागपूर

गेली २० वर्षे नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा बोलबाला राहिला. दलित, मुस्लिम, ओबीसी बहुल मतदार असलेल्या नागपूरने नेहमी काँग्रेसला साथ दिली. काँग्रेस विरोधी लाटेत ज्यावेळी इंदिरा गांधी निवडणूक हरल्या होत्या, त्या वेळी नागपुरात मात्र काँग्रेसचे गेव्ह आवारी यांना विजयी केले. मात्र, या वेळी नागपूरकर मतदारांनी खर्‍या अर्थाने सेक्युलर विचार केला. जात, धर्म, भाषा, पंथ असा कुठलाही विचार न करता केवळ विकासाला पावती दिली. जातीय समीकरणे फेल पडली. विकास पुरुष अशी प्रतिमा असलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काँग्रेसचा हा बालेकिल्ला विक्रमी मतांनी भेदला. दलित, मुस्लिम व बहुजन मतांच्या बेरजेवर काँग्रेसचे गणित अवलंबून होते. मात्र, या मतदारांनी भाजपला साथ देत काँग्रेसचे गणित बिघडविले. गडकरी हे ब्राम्हण समाजाचे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अत्यंत जवळचे होते. मात्र, त्यांना मिळालेली ५ लाख ८७ हजार ७६७ मते पाहता दलित, मुस्लिमांसह बहुजन समाजानेही त्यांना भरभरून मते दिल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे दलित व मुस्लिम बहुल मतदार असलेल्या अनुक्रमे उत्तर व मध्य नागपुरातही गडकरींनी आघाडी घेतली. हे तर काँग्रेस नेत्यांना बुचकळ्यात पाडणार आहे. गडकरींनी सुरुवातीपासूनच समाजाचे राजकारण करण्यापेक्षा राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी करण्याची भूमिका घेतली. माणूस कोणत्या जाती, धर्माचा आहे हे न पाहता गरजूंना मदत केली. अनेकांच्या वैद्यकीय उपचारासाठी मदतीचा हात दिला. सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेतला. जेथे समाजाचे भले होणार असेल तेथे राजकीय अस्पृश्यताही त्यांनी पाळली नाही. विकास पुरूष, एका उंचीचा राजनेता अशी त्यांची तयार झालेली इमेज मतदारांना आवडली. त्यांच्या या इमेजपुढे इतर सर्व फॅक्टर फ्रॅक्चर झाले. कार्यक्रमांनी केला ‘कार्यक्रम’ भाजपने संघटनात्मक शक्ती वाढविण्यावर भर दिला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जनतेच्या दारात जाण्यासाठी पक्षाने विविध कार्यक्रम दिले. हे कार्यक्रम कार्यकर्त्यांनी इमानेइतबारे राबवित सामान्य लोकांपर्यंत कमळ पोहचविले आणि यातूनच नागपुरात काँग्रेसचा ‘कार्यक्रम’ झाला. शहर भाजपने सदस्य नोंदणी अभियान राबवित ३ लाख सदस्यांची नोंदणी केली. यानंतर ‘घर घर चलो अभियान, ‘एक नोट एक वोट’ अभियान राबविले. भाजपवाले दुसर्‍यांच्या घरी चकरा मारताहेत, गडकरी डबा घेऊन फिरत नोट जमा करीत आहेत, अशी टीका त्यावेळी झाली. मात्र, डब्यात घामाची नोट टाकताना लोक व्होटही टाकत आहेत, हे काँग्रेस नेत्यांना दिसले नाही. आमदार ठरले गडकरींचे सरदार भाजपच्या चारही आमदारांनी गडकरींसाठी सरदाराची भूमिका पार पाडली. या प्रत्येक सरदाराने आपापला किल्ला (मतदारसंघ) शाबूत राखला. प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर प्रचारासाठी फिरूनही दक्षिण- पश्चिममध्ये शिग उतरू दिली नाही. शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपुरात गोवर्धन पेलून धरला. काँग्रेसी विचारसरणीचे बहुसंख्य मतदार असलेल्या पश्चिम नागपुरात आ. सुधाकरराव देशमुख यांनी घेतलेल्या परिश्रमाला फळ आले. मध्य नागपुरात आ. विकास कुंभारे यांनीही जोर लावला. दुसरीकडे काँग्रेस नेते नितीन राऊत उशिरा मैदानात उतरले. अनिस अहमद मंचावर दिसले पण मतदारांत सक्रिय दिसले नाहीत. चतुर्वेदींनी एकाकी झुंज दिली. नितीन गडकरी यांच्या ऐतिहासिक विजयानंतर नागपुरात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.