शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या निकालाचे नागपुरातही हादरे

By admin | Updated: February 11, 2015 02:18 IST

दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजप- काँग्रेसला दिलेल्या धक्क्याचे हादरे नागपुरातही बसले आहेत. जनता व कार्यकर्त्यांना गृहीत धरता येणार नाही.

नागपूर : दिल्लीत आम आदमी पार्टीने भाजप- काँग्रेसला दिलेल्या धक्क्याचे हादरे नागपुरातही बसले आहेत. जनता व कार्यकर्त्यांना गृहीत धरता येणार नाही. पक्षाची ताकद असलेल्या कार्यकर्त्यांना अधिक सन्मान देऊ, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी तर जनतेचे प्रश्न अधिक तीव्रतेने लावून धरू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. भाजपचे शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे म्हणाले, दिल्लीतील पराभव भाजपने स्वीकारला आहे. केंद्रीय नेते या पराभवावर चिंतन करून कारणे शोधतील. पण या निकालापूसन आम्हीही स्थानिक पातळीवर धडा घेण्याची गरज आहे. कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या भरवशावर उभा राहतो. येत्या काळात कार्यकर्त्यांना अधिकाधिक न्याय देण्याची, सन्मान देण्याची भूमिका पक्षाकडून घेतली जाईल. सत्तेत वावरताना नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. एका राज्यात चमत्कार झाला म्हणजे सर्वत्र होईल, असे काही नाही. पण गाफिल राहूनही चालणार नाही. आम्ही वेळीच सावध भूमिका घेऊन कार्यकर्ते व जनतेपर्यंत पोहचून त्यांचा भावना जाणून घेऊ, असेही खोपडे यांनी सांगितले. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्ता बळकावली होती. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविले. त्याचेच बक्षीस त्यांना मिळाले. काँग्रेसचाही दारुण पराभव झाला. या निकालापासून स्थानिक पातळीवर काँग्रेस धडा घेईल. काँग्रेस पक्ष सामान्य जनतेसाठी लढणारा पक्ष आहे. केजरीवाल यांनीही तेच केले. यापुढे काँग्रेस अधिक तीव्रतेने सामान्यांचे प्रश्न घेऊन आंदोलन करेल व जनतेचा विश्वास पुन्हा संपादित करेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. बरिएमंच्या नेत्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, दिल्लीतील निवडणुकीत जनतेने आपला दिलेला कौल म्हणजे लोकशाहीचा विजय होय. आपचे नेते अभिनंदनास पात्र आहेत. हवेत असणाऱ्या नेत्यांना हा एक धडा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. बसपाचे प्रदेश सचिव व मिडिया प्रभारी उत्तम शेवडे म्हणाले, १४ महिन्यात मोदींचा करिष्मा उतरला. दिशाभूल करण्याची प्रवृत्ती जनतेच्या लक्षात आली. जनतेने जोरात धक्का दिला. येत्या काळात स्थानिक राजकारणावरही याचे परिणाम दिसून येतील, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)काँग्रेसकडून अभिनंदनाची पत्रकेदिल्लीत ‘आप’ने काँग्रेसचाही सफाया केला असताना नागपुरात मात्र काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धी पत्रके काढून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. काँग्रेस सेवादलाचे नागपूर मुख्य संघटक रामगोविंद खोब्रागडे यांनी केंद्र सरकारला धक्का दिल्याबद्दल केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे तर, शहर काँग्रेसचे सचिव जॉन थॉमस यांनी मोदी सरकारच्या विरोधात जनादेश दिल्याबद्दल दिल्लीच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.