शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याचा सदोष मनुष्यवध शेतकऱ्यास चार वर्षे कारावास

By admin | Updated: June 11, 2015 02:41 IST

शेताच्या कुंपणातून वीजप्रवाह सोडून एका विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका सधन शेतकऱ्यास बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ...

नागपूर : शेताच्या कुंपणातून वीजप्रवाह सोडून एका विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका सधन शेतकऱ्यास बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. उपासराव विठ्ठलराव बरबटे (५१) असे आरोपी शेतकऱ्याचे नाव असून, तो अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहारा येथील रहिवासी आहे. दुर्गेश श्रावण बरबटे (१७), असे मृताचे नाव होते. तो लोहारा येथीलच रहिवासी होता. अकराव्या वर्गात शिकत होता. तो श्रावण बरबटे यांच्या वंशाचा एकमात्र दिवा होता. खटल्याची पार्श्वभूमी अशी, घटनेच्या वेळी दुर्गेशचे वडील श्रावण यांची शेती आरोपी उपासराव यांच्या शेताला लागून होती. श्रावण यांची शेती केवळ दोन एकर तर उपासरावची शेती बारा एकर होती. त्याने आपल्या शेतात धानाचे पीक लावले होते. पिकाची नासाडी होऊ नये म्हणून त्याने अवैधरीत्या घातक उपाययोजना केली होती. त्याने आपल्या शेताच्या कुंपणातून विद्युत प्रवाह सोडला होता. त्याने थेट विजेच्या खांबावरून वीजपुरवठा घेतला होता. त्यामुळे त्याने दिवस-रात्र वीजपुरवठा सुरूच ठेवला होता. २३ आॅक्टोबर २०१३ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दुर्गेश हा शाळेतून घरी परतल्यानंतर शेतावर काम करीत असलेल्या आपल्या आई-वडिलांना भेटण्यास गेला होता. शिकवणी वर्गाला जात असल्याचे सांगून तो घराकडे जाण्यास निघाला होता. उपासरावच्या शेतातून जात असताना त्याला कुंपणाचा स्पर्श होऊन जबरदस्त विजेचा धक्का लागला होता. क्षणात घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला होता. दुर्गेशचे आई-वडील सायंकाळी शेतातून घरी परत गेले असता त्यांना दुर्गेशची सायकल दिसली होती. त्यांनी शिकवणी वर्गात जाऊन चौकशी केली होती. दुर्गेश वर्गात आलाच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. रात्रभर शोध घेऊनही दुर्गेश कुठेही गवसला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उपासरावच्या शेतात मृतावस्थेत आढळून आला होता. मृतदेह कुंपणाला अडकलेल्या स्थितीत होता. दुर्गेशच्या वडिलांच्या तक्रारीवरून अरोली पोलिसांनी भादंविच्या ३०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. उपासरावला अटक केली होती. न्यायालयात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत भांडेकर, संदीप डोंगरे, अ‍ॅड. सतीश रोडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)