अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:09 IST2021-03-23T04:09:10+5:302021-03-23T04:09:10+5:30

जलालखेडा : अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा ...

Death of a cyclist in an accident | अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

जलालखेडा : अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव (ठाकरे) परिसरात शनिवारी (दि.२०) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

राजेंद्र महादेवराव बन्सरे (५८, रा. सुरळी, ता. वरुड, जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे. राजेंद्र बन्सरे हे आपल्या एमएच-३१/सीएक्स-०६७९ क्रमांकाच्या दुचाकीने जात हाेते. दरम्यान, नायगाव (ठाकरे) परिसरात अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. लागलीच त्यांना जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात नेण्यात आले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १८४, १३४ माेटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक प्रभाकर घाेरमाडे करीत आहेत.

Web Title: Death of a cyclist in an accident