शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वासनकरच्या पत्नी व सासूला दणका

By admin | Updated: January 29, 2015 01:04 IST

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकरची पत्नी भाग्यश्री व सासू कुमुद जयंत चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या

नागपूर : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकरची पत्नी भाग्यश्री व सासू कुमुद जयंत चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी बुधवारी दोघींनाही दणका देताना अर्जावरील प्रत्येक सुनावणीला व्यक्तीश: उपस्थित राहण्याचे निर्देश दिलेत. तसेच, या अटीसह त्यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करून शासनाला याप्रकरणी ६ फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.९ मे २०१४ रोजी लक्ष्मीनगर येथील विवेक पाठक यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ५०६, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. २७ जुलै रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रशांत वासनकर, त्याचा भाऊ विनय वासनकर व साळा अभिजित जयंत चौधरी यांना अटक केली. आरोपींनी वार्षिक ४० ते १५० टक्के व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने, ४८ महिने, पर्क, लिक्विड अशा वेगवगळ्या आकर्षक योजनांतर्गत ठेवी स्वीकारल्या होत्या. यानंतर मुदत संपूनही ठेवी परत केल्या नाहीत व परतावाही दिला नाही. आरोपींतर्फे अ‍ॅड. एम. बी. नायडू, तर शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश नायक यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)