शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

तारीख पे तारीख

By admin | Updated: July 9, 2014 01:03 IST

अभियांत्रिकीप्रमाणे यंदा तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या जागा गेल्या वर्षीप्रमाणे अधिक प्रमाणात रिक्त राहणार, अशी चिन्हे आहेत. मंगळवारी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांसाठी अर्ज दाखल करणे व निश्चित

तंत्रनिकेतन प्रवेशप्रक्रिया : केवळ ६० टक्के अर्जच दाखलनागपूर : अभियांत्रिकीप्रमाणे यंदा तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांच्या जागा गेल्या वर्षीप्रमाणे अधिक प्रमाणात रिक्त राहणार, अशी चिन्हे आहेत. मंगळवारी तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांसाठी अर्ज दाखल करणे व निश्चित करण्याची अखेरची तारीख होती. परंतु अखेरच्या दिवशीपर्यंत उपलब्ध जागांपैकी केवळ ६० टक्केच अर्ज आले. रिक्त जागांची संख्या कमी व्हावी व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करावे यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने तंत्रनिकेतन प्रवेशप्रक्रियेंतर्गत अर्ज दाखल करण्याची मुदत १४ जुलैपर्यंत वाढवली आहे. संध्याकाळी उशिरा यासंदर्भात संकेतस्थळावर माहिती देण्यात आली.२७ जूनपासून पॉलिटेक्निकच्या ‘आॅनलाईन’ प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली. नागपूर विभागातील सर्व ७१ पॉलिटेक्निक महाविद्यालये मिळून एकूण २४,६५५ जागा उपलब्ध आहेत. अगोदरच्या वेळापत्रकानुसार अखेरच्या दिवसापर्यंत ५४ ‘एआरसी’वर (अप्लिकेशन रिसिप्ट सेंटर) १४, ६८० अर्ज आले व याची टक्केवारी काढली असता ती अवघी ५९.५४ टक्के इतकीच आहे. यातीलही अनेक विद्यार्थी इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा विभागात ७ ते १० हजार जागा रिक्त राहतात की काय अशी शंका निर्माण झाली आहे.महाविद्यालयांत यंदा जास्त प्रमाणात जागा शिल्लक राहण्याची चिन्हे पाहून तंत्रशिक्षण संचालनालयाने अर्ज विकत घेणे, दाखल करणे व निश्चित करणे या प्रक्रियेला १४ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांंना काही कारणांमुळे अर्ज दाखल करता आलेला नाही त्यांना संधी मिळावी याकरिता ही मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी दिली. (प्रतिनिधी)आज लागणार अभियांत्रिकीची अंतिम यादीदरम्यान, तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेंतर्गत अंतिम प्रवेश यादी बुधवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. नागपूर विभागात जवळपास ७० टक्केच अर्ज दाखल झाले होते. ५ जुलै रोजी तात्पुरती प्रवेश यादी जाहीर करण्यात आली होती.महाविद्यालयांच्या चिंतेत वाढअगोदरच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी झाला आहे. नागपूर विभागात अभियांत्रिकीची ७१ महाविद्यालये आहे. यातील काही मोजक्या महाविद्यालयांनाच विद्यार्थ्यांकडून प्रवेशाकरिता पसंती देण्यात येते. इतर महाविद्यालयांना प्रवेश मिळविण्यासाठी कसरतच करावी लागते. त्यातच इतक्या कमी प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने रिक्त जागा भरायच्या कशा, असा प्रश्न महाविद्यालयांसमोर आहे.सुधारित वेळापत्रकअर्ज सादरीकरण व निश्चिती                १४ जुलैपर्यंततात्पुरती गुणवत्ता यादी                     १५ जुलैअंतिम गुणवत्ता यादी                          १८ जुलै