शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

सीताबर्डीनंतर धंतोलीत कारवाई

By admin | Updated: May 22, 2015 02:43 IST

शहरातील रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणाचा सफाया करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे.

नागपूर : शहरातील रस्त्यांवर वाढलेल्या अतिक्रमणाचा सफाया करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. सीताबर्डी, व्हेरायटी चौक परिसरातील दुकानांचे अतिक्रमण हटविल्यानंतर गुरुवारी धंतोली परिसरातील दुकानांच्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. तब्बल ४० दुकानांचे अतिक्रमण तोडण्यात आले. कारवाईला दुकानदारांनी विरोध केला. मात्र, त्यानंतरही कारवाई करण्यात आली.महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी सुरुवातीला धंतोली झोन अंतर्गत धंतोली व अजनी रेल्वे स्टेशन परिसरातील १५ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढले. कुर्वे मॉडेल हायस्कूल कुंभारपुरा येथील शंकरजीचे मंदिर, जोशीवाडी येथील नागमंदिर, धंतोली गुलशन बार समोरील शंकर मंदिर, मेहाडिया चौकातील जनता हॉटेल जवळील शंकरजीचे मंदिर, मेहाडिया भवन ते बगिचा रोडवरील शंकरजीचे मंदिर, आशीर्वाद पॅलेस धंतोली येथील शंकरजीचे मंदिर, चाणक्य अपार्टमेंट धंतोली बगिच्याजवळील शंकरजीचे मंदिर, काँग्रेसनगर जवळील शंकरजीचे मंदिर, शाम पॅलेस काँग्रेसनगर येथील हनुमान मंदिर, अजनी रेल्वे स्टेशन काँग्रेसनगर येथील शंकरजीचे मंदिर, अजनी रेल्वे स्टेशन समोरील झेंडा व चबुतरा, अजवी रेल्वे स्टेशन समोरील शिव मंदिर, इम्प्रेशन प्लाझा काँग्रेसनगर येथील नाग मंदिर, नीलागगन अपार्टमेंट अम्बियार रोड धंतोली येथील साई मंदिर, दीनानाथ मंदिर धंतोली परिसरातील गणेश मंदिर हटविण्यात आले. यानंतर पथकाने कारवाई करीत आनंद टॉकीज ते मुंजे चौकदरम्यान मे. नरेशचंद्र अ‍ॅण्ड कंपनी यांनी दुकानासमोर ठेवलेल्या १३ सायकल जप्त करण्यात आल्या. बर्डी आनंद टॉकीज ते मुंजे चौक या मुख्य रस्तवरील नागपूर मोबाईल शॉप, सुपर फर्निचर, मॅजिक वर्ल्ड, मोबाईल मॅजिक, पल्लवी स्टुडिओ, लक्ष्मी केशवन क्लॉथ सेंटर, धंतोली परिसरातील स्वप्नील अपार्टमेंट, डीटीडीसी बोर्ड शेड, आदित्य इंटरप्राईजेस, महावीर मोबाईल, पद्मावती एम्पोरियम, महावीर किराणा स्टोर, अजनी रेल्वे स्टेशन परिसरातील ,सत्यम हेअर ड्रेसर्स, महावीर पान मंदिर, ताराविलास अपार्टमेंट आदी दुकानांचे शेड, बोर्ड व नामफलक हटविण्यात आले.या कारवाईत तीन ट्रक सामान जप्त करण्यात आले. सोबतच १३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. झोनचे सहायक आयुक्त सुभाषचंद्र जयदेव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक अरुण पिपुरडे, बर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संखे, उपअभियंता अनिल कडू, वाहतूक शाखा दक्षिणचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र सरोदे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)