शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य तपासणी शिबिराची उत्सुकता

By admin | Updated: June 17, 2016 03:23 IST

लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

लोकमत व जैन सहेली मंडळाचे आयोजन : डॉ. दंदे फाऊंडेशनचे सहकार्यनागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार १८ जून रोजी महिला आणि मुलांसाठी बुटीबोरी स्थित श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेन्ट अँड वेलफेयर सेंटर येथे नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत आणि जैन सहेली मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ. दंदे फाऊंडेशनच्या सहाकार्याने आयोजित या शिबिराचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आयोजकांशी संपर्क साधत आहेत. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित या शिबिरात प्रामुख्याने नेत्र रोग, अस्थि रोग, जनरल सर्जरी, मेंदू रोग, मूत्राशयाशी संबंधित रोग, प्लास्टीक सर्जरी, कर्करोग, नाक, कान, गळा, स्त्री रोग, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग, जनरल मेडिसिन, त्वचा आणि गुप्त रोग, मनोविकार, श्वसन, क्षय रोग, ग्रंथी विकार आदी रोगांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व रुग्णांचे हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर, ईसीजी, ईईजी, बीएमवाई, पीएफटी, पॅप स्मीयर आदींची तपासणीही नि:शुल्क करण्यात येणार आहे. स्थानिक महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरात नोंदणी आणि अधिक माहितीसाठी लोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ येथे प्रत्यक्ष किंवा दूरध्वनी क्रमांक २४२९३५५, ९९२२९१५०३५, ९८८१७४९३९० आणि ९८२२४०६५६२ या क्रमांकावर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)