शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांच्या काळ्याबाजारावर अंकुश

By admin | Updated: June 8, 2015 02:43 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांचा काळाबाजार होत असल्याने, विद्यार्थ्यांना सत्र संपेपर्यंत पुस्तके मिळत नव्हती.

मंगेश व्यवहारे  नागपूरसर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांचा काळाबाजार होत असल्याने, विद्यार्थ्यांना सत्र संपेपर्यंत पुस्तके मिळत नव्हती. यंदा पहिल्यांदाच सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकावर लोगो लावण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्व शिक्षा अभियानाची पुस्तके विकता येणार नाही. सर्व शिक्षा अभियानाची १०० टक्के पुस्तके आठवठाभरात पोहचणार आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी पुस्तके मिळतील. ंपुस्तकांचा होणाऱ्या काळ्याबाजारामुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना सत्र संपेपर्यंत पुस्तके मिळत नसल्याची ओरड होत होती. यंदा मात्र पाठ्यपुस्तक मंडळाने पुस्तकाच्या निर्मितीचे नियोजन केले असून, सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत देण्यात येणाऱ्या पुस्तकांवर अभियानाचा लोगो लावण्यात आला आहे. पुस्तकावर किंमतसुद्धा छापलेली नाही. त्यामुळे या पुस्तकांची विक्री करता येणार नाही. परिणामी त्याचा काळाबाजार होणार नाही, असा पाठ्यपुस्तक मंडळाचा दावा आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत १ ते ८ वर्गाच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क पाठ्यपुस्तकाचा पुरवठा करण्यात येतो. पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीपासून वितरणापर्यंतची जबाबदारी बालभारतीची असते. यावर्षी पाठ्यपुस्तक मंडळाने पुस्तकाच्या निर्मितीची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्याकडून आॅनलाईन पाठ्यपुस्तकाची मागणी मागविण्यात आली. मागणीनुसारच पुस्तके छापण्यात आली. ज्या शाळा सर्व शिक्षा अभियानात येत नाही, अशा शाळांसाठी स्वतंत्र पुस्तके छापण्यात आली. त्यावर पुस्तकाचे विक्रीमूल्य नमूद केले आहे. पाठ्यपुस्तक मंडळाने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, त्यादृष्टीने सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकांच्या निर्मितीचे काम झाले आहे. पुरवठ्याचे काम दिवस-रात्र सुरू आहे. २६ जूनला शाळा सुरू होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या १५ दिवसांपूर्वीच नियोजित स्थळावर पुस्तके पोहचणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके मिळतील, असा दावा बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी केला. ंनागपूर विभागात ८६ टक्के पुस्तके पोहचलीसर्व शिक्षा अभियानांतर्गत नागपूर विभागातून ६६,२८,७२३ एवढ्या पुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे आली होती. अद्यापपर्यंत बालभारतीने ५७,२२,०५४ एवढ्या पुस्तकांचा पुरवठा केला आहे. यात नागपूर जिल्ह्याला ७८ टक्के, चंद्रपूर ९३, गोंदिया ७२, भंडारा ९५, वर्धा ९५, गडचिरोली ९४ टक्के पुस्तके पोहचली आहेत. प्रत्येक तालुक्याला पुस्तके पोहचली आहेत. आठवडाभरात १०० टक्के पुरवठ्याचे लक्ष्य पूर्ण करणार. किशोर पाटणकर, भांडार अधीक्षक, बालभारती, विभागीय कार्यालय