शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांसोबत मिळणार आता पीक व्यवस्थापन माहितीपत्रक, क्यूआर कोडमध्ये सुधारणा कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:08 IST

Nagpur : बियाणे विक्रेत्यांना दिली छापील पत्रके

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने सर्व बियाणे कंपन्यांना बॅगवर क्यूआर कोड आणि त्यात पीक व्यवस्थापन माहिती समाविष्ट करणे अनिवार्य केले आहे. कापूस बियाण्यांच्या बॅगवरील क्यूआर कोड स्कॅन होत नसल्याचेही उघड झाले. त्यामुळे सरकारच्या आदेशान्वये बियाणे कंपन्यांनी तातडीने पीक व्यवस्थापन माहितीपत्रके छापली आणि ती विक्रेत्यांकडे पाठविली आहेत.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने १५ जानेवारीला अध्यादेश काढून बियाण्यांच्या बॅगांवर क्यूआर कोड अनिवार्य केला. काही कंपन्यांनी आक्षेप घेतल्याने सरकारने १४ एप्रिलला नवी अध्यादेश काढून बियाण्यांसह खते, कीटकनाशके तसेच प्रत्येक कृषी निविष्ठांवर क्यूआर कोड अनिवार्य केला. हा क्यूआर कोड स्मार्ट फोनमधील गुगल लेन्स अथवा गुगल पे वगळता इतर अॅपने स्कॅन होत नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आले. काही क्यूआर कोडमध्ये पीक व्यवस्थापन माहिती असल्याचे तर काहींमध्ये कंपनीच्या जाहिराती असल्याचे आढळून आले. 

त्याअनुषंगाने 'लोकमत'मध्ये 'बियाण्यांच्या बॅगांवरील क्यूआर कोडचा उपयोग काय?' या शीर्षकाखाली २४ मे रोजी वृत्त प्रकाशित केले होते. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने या वृत्ताची दखल घेत बियाणे कंपन्यांच्या त्यांच्या क्यूआर कोडमध्ये सुधारणा करून त्यात योग्य ती माहिती समाविष्ट करण्याचे आदेश दिले. कमी काळात या बाबी करणे शक्य नसल्याने कंपन्यांनी सरकारच्या निर्देशानुसार पीक व्यवस्थापन माहितीपत्रक छापली आणि ती प्रत्येक कृषी सेवा केंद्रांमध्ये पाठविली आहे. ही माहितीपत्रके बियाण्यांसोबत शेतकऱ्यांना देणेही विक्रेत्यांना अनिवार्य केले आहे. शेतकऱ्यांनी या पत्रकांमधील माहितीवर अंमल करणे अनिवार्य आहे. 

सूक्ष्म अन्नद्रव्यांची अतिरिक्त माहिती

  • पूर्वीच्या क्यूआर कोडमध्ये पीक नियोजन पद्धतीत बियाण्यांचे प्रमाण, पेरणी पद्धती, तण, कीड व रोग व्यवस्थापन, खते नियोजन या महत्त्वाच्या बाबींची माहिती दिली होती.
  • छापील माहितीपत्रकांमध्ये जमिनीची निवड, वाण गुणवत्ता गुणधर्म, बीजप्रक्रिया, सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन, वाढ नियंत्रकाचा वापर, किडींची आर्थिक नुकसान पातळी, किडींचे जैविक व यांत्रिक पद्धतीने व्यवस्थापन, पीक काढणी तपशील या अतिरक्त व अत्यंत महत्त्वाच्या माहितीचा समावेश केला आहे.
टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेतीnagpurनागपूर