शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

महिलांविरुद्धचे गुन्हे वाढताहेत - पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली चिंता :

By admin | Updated: June 11, 2015 02:42 IST

राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपुरात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे.

ठाणेदारांना दिले कडक कारवाईचे आदेश नागपूर : राज्याची उपराजधानी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपुरात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. परंतु आता कुठल्याही गुन्हेगाराला सोडू नका, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी शहरातील सर्व ठाणेदारांना दिले. बुधवारी सकाळी सिव्हिल लाईन्स येथील पोलीस जिमखाना येथे शहरातील गुन्ह्यांसंदर्भात आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत त्यांनी उपरोक्त निर्देश दिले. बैठकीत सहपोलीस आयुक्त राजवर्धन, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, दीपक पांडेय, उपायुक्त क्राईम दीपाली मासीरकर, निर्मलादेवी, संजय लाटकर, अभिनाश कुमार, सहायक पोलीस आयुक्त पंडित भगत व विशेष सेलसहित वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.बैठकीनंतर पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, वर्ष २०१४ ते वर्ष २०१५ च्या जानेवारी ते मेपर्यंत घडलेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीचा आढावा घेण्यात आला. यात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. महिलांशी संबंधित गुन्हे थांबविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच पोलीस ठाण्यात प्रत्येक नागरिकांशी आदरयुक्त व्यवहार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय वाढते अपघात लक्षात घेऊन वाहतूक विभाग विशेष अभियान चालविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)