शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'ट्रेड डील'मुळे कापसाची आयात वाढणार ! शेतकरी संकटात अन् कापड उद्योगाचं चांगभलं होण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 13:03 IST

Nagpur : भारत- अमेरिका 'ट्रेड डील'मुळे कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आधीच कापसाची आयात सातत्याने वाढत असून, निर्यात घटत चालली आहे.

सुनील चरपे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत- अमेरिका 'ट्रेड डील'मुळे कापसावरील ११ टक्के आयात शुल्क रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आधीच कापसाची आयात सातत्याने वाढत असून, निर्यात घटत चालली आहे. या डीलमुळे अमेरिकेतून कापसाची आयात वाढणार असल्याने देशांतर्गत बाजारात कापसाचे दर दबावात येऊन शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. अल्प निर्यात असलेल्या भारतीय कापड उद्योगाला स्वस्त दरात कापूस मिळणार असल्याने त्यांचा या डीलमुळे फायदा होणार आहे.

कापडाची निर्यात व देशांतर्गत गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय कापड उद्योगाला दरवर्षी ३१५ ते ३२० लाख गाठी कापसाची आवश्यकता आहे. भारतात दरवर्षी ३३० ते ३४० लाख गाठी कापसाचे उत्पादन होते. भारताला प्रीमियम क्वॉलिटी कापड उत्पादनासाठी अतिरिक्त लांब धाग्याच्या १२ ते १५ लाख गाठी कापसाची आवश्यकता आहे.

या कापसाचे उत्पादन ३ ते ४ लाख गाठींचे असून, दरवर्षी १० ते १२ लाख गाठींची आयात करावी लागते. भारतात सर्वाधिक लांब व मध्यम लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन होते. भारताच्या तुलनेत जागतिक बाजारात कापसाचे दर कमी असल्याने भारतीय कापड उद्योग अतिरिक्त लांब धाग्याच्या नावाखाली लांब धाग्याच्या कापसाची आयात करतात आणि दर पाडतात. कापसाचे दर एमएसपीपेक्षा कमी झाल्यास सरकार एकूण उत्पादनाच्या २२ ते २७ टक्के कापूस एमएसपी दराने खरेदी करते. 'ट्रेड डील'मुळे शुल्कमुक्त कापूस आयातीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

भारताची कापड निर्यात

जागतिक बाजारात कापड निर्यातीत चीन प्रथम क्रमांकावर असून, भारत सहाव्या क्रमाकांवर आहे. भारताचा कापड निर्यात वाटा केवळ चार टक्के आहे. यातील २५ ते ३० टक्के कापड अमेरिकेत निर्यात केले जाते. युरोपियन युनियन, व्हिएतनाम, बांगलादेश व तुर्की हे भारताचे प्रमुख स्पर्धक आहेत.

कापड उद्योगाचा फायदा कसा?

सन २०२१-२२ मध्ये रुईचे दर १ लाख ५ हजार रुपये खंडी होते. त्यामुळे सन २०२२-२३ मध्ये कापडाचे दर वाढले होते. २०२२-२३ मध्ये रुईचे दर ४० टक्क्यांनी घटले आणि ६२ हजार रुपये खंडीवर आले. मात्र, उद्योगांनी कापडाचे दर ४० टक्क्यांनी कमी केले नाहीत. सध्या रुईचे दर ५५ ते ५७ हजार रुपये खंडी असून, कापडाचे दर १ लाख रुपये खंडीच्या दरात आहेत.

कापसाची आयात व निर्यातवर्ष -            आयात          निर्यात (लाख गाठी)२०१९-२०       १५.५०               ४७.०४२०२०-२१       ११.०३               ७७.५९२०२१-२२       १४.००               ४३.००२०२२-२३       १५.२०               १५.५०२०२३-२४       २२.००               २८.३६२०२४-२५       ४१.००               १८,००२०२५-२६       ५०,००               १५,००(२०२५-२६ चे आकडे १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या चार महिन्यांतील आहेत.)

भारताने गमावलेली संधी व्हिएतनामच्या पदरात

जगात बांगलादेशच्या कापडाला भरीव मागणी आहे. बांगलादेशचा कापड उद्योग भारतीय कापसावर अवलंबून आहे.राजकीय अस्थिरतेमुळे बांगलादेशचे जागतिक कापड बाजारातील स्थान डळमळीत झाल्याने त्यांचे ग्राहक मिळविण्याची भारताला संधी होती. भारत सरकारने याकडे लक्ष न दिल्याने ही संधी व्हिएतनामने कॅश केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Trade Deal Threatens Cotton Farmers, Benefits Textile Industry: Report

Web Summary : A US trade deal may eliminate cotton import duties, increasing imports and harming Indian cotton farmers. The textile industry, however, will benefit from cheaper cotton despite low export share and Vietnam seizing opportunities.
टॅग्स :cottonकापूसAmericaअमेरिकाIndiaभारतFarmerशेतकरीnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र