शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

धंतोलीतील रस्ता रात्रभरात दुरुस्त

By admin | Updated: May 6, 2017 02:47 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी मनपा अधिकाऱ्यांना कारागृहात पाठविण्याची तंबी दिल्यानंतर

हायकोर्टाचा दणका : अधिकाऱ्यांनी लगेच केली धावपळ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी मनपा अधिकाऱ्यांना कारागृहात पाठविण्याची तंबी दिल्यानंतर धंतोलीतील एक रस्ता रात्रभरात दुरुस्त करण्यात आला. स्पंदन रुग्णालयाच्या बाजूला नवीन रुग्णालय बांधले जात आहे. या ठिकाणी बांधकाम साहित्य घेऊन येणाऱ्या वाहनांमुळे सार्वजनिक रस्ता उखडला होता. तसेच, बांधकामाचे साहित्य रस्त्यावरच ठेवले जात होते. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. २७ एप्रिल रोजी न्यायालयाने यावरून मनपाला फटकारले होते. त्यानंतरही रस्ता दुरुस्त करण्यात आला नव्हता. परिणामी, न्यायालयाने ४ मे रोजी संबंधित रस्ता सकाळी १०.३० वाजतापर्यंत दुरुस्त करण्याचा मौखिक आदेश दिला होता. तसेच, आदेशावर अंमलबजावणी न झाल्यास अधिकाऱ्यांना कारागृहात पाठवू अशी तंबी दिली होती. त्यानंतर मनपाने तातडीने पावले उचलून रात्रभरात रस्ता दुरुस्त केला. आज, शुक्रवारी हे प्रकरण न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आले असता मनपाने रस्ता दुरुस्त केल्याची माहिती दिली. रस्ता खराब झाल्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित करणाऱ्या धंतोली नागरिक मंडळाने कामाच्या दर्जावर आक्षेप घेतला. रस्त्याचे काम गुणवत्ताहीन असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर उत्तर सादर करताना मनपाने गुणवत्ता सुधारण्याची ग्वाही दिली. परिणामी न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी तहकूब करून उन्हाळ्याच्या सुट्यानंतरची तारीख दिली.