शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : जो बाहर गया, वो समझो मर गया... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 23:10 IST

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वच पातळ्यांवरून जनजागृती सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. नागपूर पोलिसांनीही नागरिकांच्या जनजागृतीसाठी अशीच कल्पना अमलात आणली आहे. अभिनेत्यांच्या फोटोंसह गाजलेल्या डायलॉगचा वापर करून सोशल मीडियावरून जनतेपर्यंत संदेश पोहचविला जात आहे.

ठळक मुद्देअभिनेत्यांच्या डायलॉगमधून प्रबोधन : नागपूर पोलिसांकडून अशीही जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वच पातळ्यांवरून जनजागृती सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. नागपूर पोलिसांनीही नागरिकांच्या जनजागृतीसाठी अशीच कल्पना अमलात आणली आहे. अभिनेत्यांच्या फोटोंसह गाजलेल्या डायलॉगचा वापर करून सोशल मीडियावरून जनतेपर्यंत संदेश पोहचविला जात आहे.

सर्वच यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृती सुरू असताना यात पोलीस विभागही मागे नाही. जनमानसावर आणि तरुणाईवर ठसा उमटविलेल्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांचा उपयोग त्यांनी कल्पकतेने करू न घेतला आहे. कोरोनापासून बचाव करण्याचा संदेश देण्यासाठी शाहरुख खान, अमजद खान, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन यांसारखे अभिनेते नागरिकांच्या मोबाईल स्क्रीनवर पोलिसांच्या सोशल मीडियावरून झळकत आहेत. पंतप्रधानांनी देशात लागू केलेले लॉकडाऊन २१ दिवसांचे आहे.

कोरोनावर विजय मिळवायचा असेल तर ही २१ दिवसांची लढाई घरातच बसून जिंका, असा संदेश बिंबविण्यासाठी शाहरुख खानची ऐटबाज पोज असलेल्या छायाचित्राचा उपयोग करण्यात आला आहे. या चित्रासोबत ‘सीर्फ २१ दिन और..., व्हिक्टोरी इन...’ असा संदेश देण्यात आला आहे.

‘शोले’ चित्रपट गब्बरसिंंगच्या दणदणीत डायलॉगने गाजला आहे. अरे ओ सांबा.... हा यातीलच फेमस डायलॉग. याच प्रसंगातील ‘जो डर गया, समझो मर गया’ हेसुद्धा यातील एके काळी अत्यंत गाजलेले वाक्य. हेच वाक्य पोलिसांनी जनजागृतीसाठी वेगळया पद्धतीने वापरत, ‘जो बाहर गया, समझो मर गया...’ असा थेट संदेश दिला आहे.संचारबंदीमुळे सर्वांनच घराबाहेर पडण्यास बंदी आहे. चौकाचौकात पोलीस दंडुके घेऊन उभे आहेत. ही परिस्थिती अमिताभ बच्चनच्या डायलॉगसोबत साधली आहे. त्यांचे अनेक डायलॉग आजही तरुणाईच्या ओठी आहेत. ‘हमे ढुंढना मुश्कील ही नहीं, नामुमकिन है’ असे म्हणत एकमेकांची फिरकी घेणारे मित्र आजही दिसतात. याच डायलॉगला नवे रूप देत, ‘घर से निकलना मुश्कील ही नही, नामुमकीन है’ असा संदेश पोलिसांनी दिला आहे.दीपिका पदुकोन आणि शाहरुख खान यांची ‘ओम शांती ओम’मधील जोडी तरुणाईला चांगलीच भावली आहे. या दोघांचे एकत्रित असलेले छायाचित्र अनेकांच्या आवडीचे आहे. याच छायाचित्राचा उपयोग करून ‘होम शांती होम’ असा संदेश पोलिसांनी दिला आहे. कोरोनाच्या दिवसात घरातच राहा, तिथेच शांती आहे. बाहेर फिरून पोलिसांचा उगीच प्रसाद खाऊ नका, असेही कदाचित पोलीस विभागाला यातून सुचवायचे असावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Policeनागपूर पोलीस