शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

Coronavirus :  नागपूर विमानतळावर केवळ विदेशी प्रवाशांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:50 AM

विदेशात गेलेला भारतीय प्रवासी मुंबई आणि दिल्ली विमानतळावर उतरून तेथून विमानाने नागपुरात आल्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक तपासणीविना शहरात दाखल होत असल्याने कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्दे घरगुती प्रवासी तपासणीविना विमानतळाबाहेर : आरोग्य विभागाचे डॉक्टर तैनात

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : देशांतर्गत विमानाने नागपुरात येणाऱ्या प्रवाशांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपासणी करण्यात येत नाही. त्यामुळे विदेशात गेलेला भारतीय प्रवासी मुंबई आणि दिल्ली विमानतळावर उतरून तेथून विमानाने नागपुरात आल्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधक तपासणीविना शहरात दाखल होत असल्याने कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अशीच घटना नागपुरात एका प्रवाशासंदर्भात घडली आहे. अमेरिकेतून मुंबईत आणि मुंबईतून नागपुरात दाखल झालेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.नागपुरात दोहा-नागपूर आणि शारजाह-नागपूर या दोन थेट विमानसेवा आहेत. पण विदेशातून देशातील विमानतळावर उतरल्यानंतर तेथून नागपुरात विमानाने दाखल होणारे अनेक प्रवासी आहेत. अशा प्रवाशांना घरगुती प्रवासी समजून त्यांची विमानतळावर तपासणी करण्यात येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.अधिकारी म्हणाले, विमानतळ प्रशासनाला ५ मार्चच्या रात्री केंद्रीय मंत्रालयाकडून आदेश आल्यानंतर त्वरित विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडने (एमआयएल) विमानतळावर हेल्प डेस्क स्थापन केला आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाचे दोन डॉक्टर, दोन पॅरामेडिकल स्टॉफ, नर्स आणि एमआयएलचे अधिकारी तैनात आहेत. त्यांच्यातर्फे प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे. संशयित प्रवाशाला बाहेर काढून त्याला पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. विमानतळावर सर्व प्रकारची सतर्कता बाळगण्यात येत आहे. मध्यरात्रीनंतर दोहा आणि शारजाह येथून येणाऱ्या सर्व प्रवाशांची डॉक्टरांतर्फे अद्ययावत उपकरणांद्वारे तपासणी करण्यात येत आहे. विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना थर्मल स्कॅनिंग केल्यानंतरच विमानतळाबाहेर पाठविण्यात येत आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी बैठकीत निर्णय घेत १३ मार्च ते १५ एप्रिलपर्यंत विदेशी व्हिसा रद्द केला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून केवळ भारतीय प्रवासी विदेशातून भारतात दाखल होणार आहेत. विदेशातून नागपुरात येणाऱ्या प्रवाशांवर आमचे लक्ष असून सर्वांची स्कॅनिंग करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.तपासणीसाठी विमानतळावर डॉक्टरांची चमू तैनातनागपूर विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांची चमू ६ मार्चच्या सकाळपासूनच तैनात आहे. सर्वांची थर्मल स्कॅनिंगने तपासणी करण्यात येत आहे. संशयित प्रवाशाला शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येत आहे. विदेशी प्रवाशांची दिल्ली, मुंबई वा अन्य विमानतळांवर तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतरच ते नागपुरात दाखल होत आहेत.एम. ए. आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल.

टॅग्स :corona virusकोरोनाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर