शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांत ‘कोरोना’चा सव्वातीन लाख टन जैविक कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उपराजधानीवर अद्यापही ‘कोरोना’चे संकट कायम असून रुग्णांची संख्या घटलेली नाही. मार्च महिन्यापासून सरकारसह अनेक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उपराजधानीवर अद्यापही ‘कोरोना’चे संकट कायम असून रुग्णांची संख्या घटलेली नाही. मार्च महिन्यापासून सरकारसह अनेक खासगी इस्पितळांतदेखील ‘कोरोना’च्या रुग्णांचा उपचार झाला. नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात ‘कोरोना’मुळेच तब्बल सव्वातीन लाख मेट्रिक टन जैविक कचरा निर्माण झाला. एकूण वैद्यकीय कचऱ्याच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक होते. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेला विचारणा केली होती. मार्च ते नोव्हेंबर-२०२० या कालावधीत नागपुरात किती जैविक कचरा निघाला, त्यातील ‘कोरोना’मुळे निघालेल्या कचऱ्याचे प्रमाण किती होते, कचरा कुठे साठविण्यात आला, किती इस्पितळांना कचऱ्यांशी संबंधित नियम न पाळल्याने दंड झाला इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मार्च ते नोव्हेंबर २०२० या काळात नागपूर शहरात ३ लाख २७ हजार ५७१ मेट्रिक टन जैविक कचरा उचलण्यात आला. दर महिन्याची सरासरी काढली तर हे प्रमाण ३६ हजार ३९६ मेट्रिक टन इतके होते. हा सर्व कचरा प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार भांडेवाडी येथे जाळण्यात आला.

तीन वर्षांच्या तुलनेत वाढला कचरा

२०१८ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत शहरात ‘कोरोना’चा कचरा वगळता एकूण ७ लाख ६२ हजार १९० मेट्रिक टन वैद्यकीय कचरा गोळा करण्यात आला. प्रति महिना ही सरासरी २१ हजार ७७६ मेट्रिक टन इतका होतो. या तुलनेत ‘कोरोना’चा नऊ महिन्यातील कचरा प्रतिमहिना ३६ हजार ३९६ मेट्रिक टन इतका होता. वैद्यकीय कचऱ्याच्या तुलनेत ‘कोरोना’ कचऱ्याचे प्रमाण हे ६७ टक्क्यांनी अधिक होते.

नियमभंग करणाऱ्यांना १० लाखांचा दंड

‘कोरोना’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता कचरा फेकणाऱ्या एकूण ६३ व्यक्ती व इस्पितळांविरोधात मनपातर्फे कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १० लाख २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दृष्टिक्षेपात जैविक कचरा

‘कोरोना’ वगळता वैद्यकीय कचरा (२०१८ ते नोव्हेंबर २०२०) -७,६२,१९०.२८५ मेट्रिक टन

‘कोरोना’चा जैविक कचरा-३,२७,५७१.८२ मेट्रिक टन