शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

लाखोची सामुग्री कवडीमोल भावात विकणार

By admin | Updated: May 24, 2015 03:00 IST

महापालिका कार्यालयातील संगणक ,स्कॅनर, प्रिंन्टर, टोनर यात किरकोळ बिघाड झाला की, ही सामुग्री भंगारात टाकली जाते.

नागपूर : महापालिका कार्यालयातील संगणक ,स्कॅनर, प्रिंन्टर, टोनर यात किरकोळ बिघाड झाला की, ही सामुग्री भंगारात टाकली जाते. लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेली सामुग्री कवडीमोल भावात विकण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सामान्य प्रशासन विभागाने ही सामुग्री ई-कचऱ्यात दर्शवून ती ९४ हजारात विकणार आहे. २६ मे रोजी होणाऱ्या मनपाच्या आमसभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. संगणक डिस्क वगळता इतर नादुरुस्त साहित्य ई-कचऱ्याच्या श्रेणीत टाकरण्यात आले आहे. ई-कचरा विल्हेवाट समितीच्या बैठकीत सरकारी मूल्यांककाची नियुक्ती करून या कचऱ्याचे मूल्यांकन करण्यात आले. विशेष म्हणजे ई-कचऱ्याची उपयुक्तता व तांत्रिक माहिती असलेल्यांना या समितीत स्थान देण्यात आलेले नाही. या विषयाचे ज्ञान असणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार स्कॅनर व टोनरचा पुन्हा वापर करता येतो. बाजारातही या सामुग्रीला चांगली किंमतही मिळते. परंतु ही सामुग्री कचऱ्याच्या श्रेणीत टाकण्यात आली आहे. त्यामुळे ती कवडीमोल भावाने विकली जात आहे. ई-कचरा समितीचे अध्यक्ष उपायुक्त (१) आहे. परंतु त्यांना चुकीची माहिती देऊन नादुरुस्त सामुग्रीची किंमत लावण्यात आली आहे. नॅशनल इन्फार्मेटीक्स सेंटर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ई-कचऱ्याचे मूल्यांकन करण्याची तयारी दर्शविली होती. परंतु प्रतिसाद न मिळाल्याचे कारण देत सरकारी मूल्यांककाची नियुक्ती करण्यात आली. जाहीर लिलाव करून ही सामुग्री विक ण्याचा विचार आहे. परंतु याची किंमतच कमी दर्शविल्याने यात मनपाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)