शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाला अवमानना नोटीस

By admin | Updated: February 28, 2015 02:26 IST

परिवहन कार्यालयात एजंट प्रतिबंधाच्या नावाखाली अधिकृत प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात येत असल्याच्या आरोपाची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ...

नागपूर : परिवहन कार्यालयात एजंट प्रतिबंधाच्या नावाखाली अधिकृत प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात येत असल्याच्या आरोपाची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, परिवहन आयुक्त महेश झगडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके, प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) शरद जिचकार व उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) रवींद्र भुयार यांना अवमानना नोटीस बजावून १६ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.यासंदर्भात संतोष गुप्ता व इतर ८ वाहन मालकांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अशोक भंगाळे यांच्यासमक्ष शुक्रवारी याचिकेवर सुनावणी झाली. परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी १२ जानेवारी २०१५ रोजी परिपत्रक काढून परिवहन कार्यालयांत एजंटना प्रवेश करू देऊ नका, असे निर्देश दिले आहेत. यामुळे परिवहन अधिकारी एजंटसह वाहन मालकांच्या अधिकृत प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारत आहेत. उच्च न्यायालयाने १९८७ व १९९९ मध्ये दाखल प्रकरणांवर निर्णय देताना निर्धारित नमुन्यातील पत्र देऊन अधिकृत करण्यात आलेल्या प्रतिनिधींना प्रतिबंध करू नये, असे निर्देश दिले आहेत. झगडे यांचे परिपत्रक या निर्णयांचा अवमान करणारे असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.वाहन मालकांनी फिटनेस प्रमाणपत्र, परमिट, पासिंग इत्यादी विविध कामे करण्यासाठी आरटीओ कार्यालयात प्रतिनिधी नेमले आहेत. या प्रतिनिधींना अधिकृत करण्यासाठी आरटीओ कार्यालयाला विशिष्ट माहितीचे पत्र द्यावे लागते. या पत्राचा नमुना ठरलेला आहे. अधिकृत प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्याविरुद्ध वाहन मालकांनी उच्च न्यायालयात तीन रिट याचिकाही दाखल केल्या आहेत. न्यायालयाने यापैकी दोन याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना प्रवेश देण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर तर, शासनातर्फे सहायक सरकारी वकील केतकी जोशी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)