तारसा येथे दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:51+5:302021-06-24T04:07:51+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : तालुक्यातील तारसा गावात गेल्या १० दिवसापासून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आराेग्यास ...

Contaminated water supply at Tarsa | तारसा येथे दूषित पाणीपुरवठा

तारसा येथे दूषित पाणीपुरवठा

लाेकमत न्यूज नेटवर्क

माैदा : तालुक्यातील तारसा गावात गेल्या १० दिवसापासून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे नागरिकांच्या आराेग्यास धाेका निर्माण झाला आहे. परंतु या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.

तालुक्यातील माेठे गाव असलेल्या तारसा येथे सांड नदीतील याेजनेद्वारे ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठा केला जाताे. परंतु मागील १० दिवसापासून घरगुती नळांना दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आराेग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काेराेना महामारीच्या संकटात नागरिकांना दूषित पाणीपुरवठा हाेत असल्याने हा एकप्रकारे नागरिकांच्या आराेग्याशी खेळ असल्याचा आराेप नागरिकांचा आहे. दूषित पाण्यामुळे गावात साथीचे आजार बळावल्यास त्यास काेण जबाबदार राहील, असाही प्रश्न गावकरी विचारत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवून ही समस्या साेडवावी, अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात नागरिकांच्या शिष्टमंडळाने तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. रूपेश नारनवरे तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, खंडविकास अधिकारी, सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन साेपविले आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते शुभम गिरडकर, शुभम गभणे व नागरिकांचा समावेश हाेता.

Web Title: Contaminated water supply at Tarsa