शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

कंटेन्मेंट झोन फलक ना रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST

सर्वकाही सुरळीत : संक्रमण कसे थांबणार? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागपुरात अधिक रुग्ण ...

सर्वकाही सुरळीत : संक्रमण कसे थांबणार?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागपुरात अधिक रुग्ण असलेल्या भागांना हॉटस्पॉट घोषित करून कंटेन्मेट झोन घोषित करण्यात आले होते. कंटेन्मेंट झोन घोषित करताना टीन लावून परिसर सील करून पोलीस बंदोबस्त लावला जात होता. अत्यावश्यक सेवाशिवाय या क्षेत्रातील नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते; परंतु यावेळी शहरात गृहविलगीकरणात ५१२१३ रुग्ण आहेत. तर १४९७३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. शहराच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात रुग्ण आहेत; परंतु अधिक रुग्ण असलेल्या १५७ भागांना कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. काही ठिकाणी परिसर सील करण्यात आला; परंतु येथे पूर्वीसारखा पोलीस बंदोबस्त नाही.

राज्य सरकारने चेन ब्रेक करण्यासाठी निर्बंध अधिक कठोर केले आहेत. त्यासाठी कंटेन्मेंट झोन निर्माण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पाॅझिटिव्ह रुग्ण असलेल्या भागात दोन्ही बाजूला टिन लावून रस्ता बंद केला जात आहे. काही भाग खुला ठेवला जात आहे. येथे सुरक्षा रक्षक नसल्याने नागरिक बिनधास्त फिरत आहेत. गृहविलगीकरणात असलेल्यांकडे लोकांची ये-जा सुरू असल्याने संक्रमणाचा धोका कायम आहे.

....

झोननिहाय कंटेन्मेंट झोन

लक्ष्मीनगर - २३

ध्रमपेठ २८

हनुमाननगर २३

धंतोली २६

नेहररूनगर ८

गांधीबाग ११

सतरंजीपुरा १२

लकडगंज १९

आसीनगर १४

मंगळवारी ११

एकूण १७५