शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी काँग्रेसचा हल्लाबोल

By admin | Updated: May 9, 2015 02:22 IST

शहरातील बहुतांश वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या मुद्यावरून शुक्रवारी काँग्रेसने महापालिकेत हल्लाबोल केला.

नागपूर : शहरातील बहुतांश वस्त्यांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नसल्याच्या मुद्यावरून शुक्रवारी काँग्रेसने महापालिकेत हल्लाबोल केला. रिकामे मडके घेऊन आलेल्या काँग्रेसजनांनी तब्बल दीड तास महापौर प्रवीण दटके यांना घेराव घातला. नागरिकांना पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पैसे घेतले जात आहेत. नगरसेवकांनी पाणी देण्याची मागणी केली, आग्रह धरला तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून दडपशाही केली जात आहे, असे सांगत ओसीडब्ल्यूचा करार रद्द करा, अशी मागणी काँग्रेसतर्फे करण्यात आली. आपणही कंपनीच्या दबाबात असाल तर राजीनामा द्या, अशी मागणीही महापौरांकडे करण्यात आली. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे नगरसेवक महापालिकेत धडकले. सुरुवातीला महापौर प्रवीण दटके कक्षात नसल्यामुळे त्यांनी महापौर कक्षात नारेबाजी करीत ठाण मांडले. काही वेळातच महापौर आले. नगरसेवकांच्या मागणीवरून महापौर दटके यांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. पुढे दीड तास काँग्रेस नगरसेवक व कार्यकर्त्यांनी महापौरांना घेराव घातला व शहराच्या विविध भागात असलेली पाणीटंचाई व ओसीडब्ल्यू कंपनीकडून होत असलेल्या अरेरावीचा पाढाच महापौरांसमोर वाचण्यात आला. विकास ठाकरे म्हणाले, ओसीडब्ल्यू कंपनी शहरात २४ तास पाणीपुरवठा करणार होती. मात्र, प्रत्यक्षात नागरिकांना वापरापुरतेही पाणी मिळेनासे झाले आहे. शहराला दररोज ७५० एमएलडी पाणीपुरवठा होतो. याचे नियोजन केले सर्व भागांना पुरेसे पाणी मिळू शकते. पण काही भागात पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. बहुतांश फ्लॅट स्कीममध्ये नळाद्वारे पाणीच चढत नाही. जलवाहिनी असलेल्या भागात पाणीपुरवठा होत नसेल तर त्या भागात नि:शुल्क टँकर देण्याची जबाबदारी ओसीडब्ल्यूची आहे. मात्र, ओसीडब्ल्यू नागरिकांकडून टँकरचे पैसे घेत आहे. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून टँकरच्या माध्यमातून वसुली करण्याचा गोरखधंदा सुरू आहे. पाणी मिळत नसलेल्या भागातील लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला तर ओसीडब्ल्यूचे अधिकारी लोकप्रतिनिधीवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देतात. महापालिकेत भाजप सत्तेत असली तरी ओसीडब्ल्यूने भाजप नगरसेवकांवरही गुन्हे दाखल करण्याचे धाडस केले आहे. महिलांनी तक्रार केली तर त्यांच्याशी ते उद्धटपणे बोलतात. असे असतानाही महापालिकेचे पदाधिकारी ओसीडब्ल्यूच्या विरोधात एक शब्दही बोलायला तयार नाहीत. ओसीडब्ल्यूच्या मालकाशी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे हितसंबंध असल्यामुळे पदाधिकारी गप्प आहेत का, असा सवालही ठाकरे यांनी केला. यावर महापौर दटके यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश ओसीडब्ल्यूला दिले जातील, असे आश्वस्त केले. आंदोलनात नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, डॉ. प्रशांत चोपडा, भावना लोणारे, अरुण डवरे, पुष्पा निमजे, तनवीर अहमद, उमाकांत अग्निहोत्री यांच्यासह काँग्रेस नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)