'गॅस-डिझेल वितरणात गोंधळ खपवून घेतला जाणार नाही' पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 16:32 IST2026-05-19T16:11:25+5:302026-05-19T16:32:47+5:30

Nagpur : कोणत्याही जीवनावश्यक वितरण प्रणालीमधील पारदर्शकता ही ग्राहकांचा विश्वास वृद्धिंगत करत असते. मात्र, हे साधे सूत्र गॅस कंपन्या, गॅस एजन्सी, पेट्रोलियम कंपन्या आणि पेट्रोलपंप चालकांकडून सर्रास धाब्यावर बसवले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

'Confusion in gas-diesel distribution will not be tolerated', Guardian Minister puts officials on edge | 'गॅस-डिझेल वितरणात गोंधळ खपवून घेतला जाणार नाही' पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

'Confusion in gas-diesel distribution will not be tolerated', Guardian Minister puts officials on edge

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
कोणत्याही जीवनावश्यक वितरण प्रणालीमधील पारदर्शकता ही ग्राहकांचा विश्वास वृद्धिंगत करत असते. मात्र, हे साधे सूत्र गॅस कंपन्या, गॅस एजन्सी, पेट्रोलियम कंपन्या आणि पेट्रोलपंप चालकांकडून सर्रास धाब्यावर बसवले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि इतर कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत त्यांना धारेवर धरले.

शासनाने या वितरण व्यवस्थेत वेळोवेळी सुधारणा केली, जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठका घेऊन स्पष्ट निर्देश दिले; एवढे सगळे होऊनही ग्राहकांना वेळेवर एक साधा 'मेसेज' पोहोचवण्याची जबाबदारी कंपन्या का पार पाडत नाहीत, असा सवाल पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केला. ग्राहकांना वेळेवर गॅस मिळावा आणि वितरणातील सर्व त्रुटी तत्काळ दूर व्हाव्यात, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते अत्यंत आक्रमक भूमिकेत पाहायला मिळाले. या बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल, जिल्हा दक्षता समितीचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

पुरवठा वाढवूनही ग्राहकांच्या नशिबी रांगाच

गॅस वितरणातील त्रुटी दूर करून ग्राहकांना अधिकाधिक तत्पर सेवा देणे ही गॅस एजन्सी चालक आणि कंपन्यांची प्राथमिक जबाबदारी असायला हवी. मात्र, आजच्या घडीला गॅस एजन्सींकडून ग्राहकांना गॅस उपलब्धतेबाबत कोणतेही संदेश (एसएमएस) दिले जात नाहीत. दुसऱ्या बाजूला कंपन्यांकडून गॅसचा पुरवठा वाढवला असल्याचा दावा केला जात असताना, प्रत्यक्ष जमिनीवर मात्र लोकांना अजूनही रांगा का लावाव्या लागत आहेत, अशी विचारणा पालकमंत्र्यांनी केली.

...तर अवजड यंत्रसामग्री पेट्रोलपंपावर आणायची कशी?

ग्रामीण आणि औद्योगिक क्षेत्रातील गंभीर समस्येकडे लक्ष वेधताना पालकमंत्री बावनकुळे यांनी पेट्रोलपंप चालकांच्या मनमानीवर नाराजी व्यक्त केली. ग्रामीण भागात पोकलेन, जेसीबी, ट्रॅक्टर आणि इतर मोठी अवजड यंत्रसामग्री कार्यरत असते. या सर्व वाहनांना आणि यंत्रांना डिझेल भरण्यासाठी थेट पेट्रोलपंपावर येण्याची सक्ती केली जात असल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. 

Web Title: 'Confusion in gas-diesel distribution will not be tolerated', Guardian Minister puts officials on edge