शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

छोटी सी मुलाखतमुळे इच्छुकांमध्ये संभ्रम

By admin | Updated: January 15, 2017 20:56 IST

भारतीय जनता पक्षाच्या मुलाखतींचे सत्र शनिवारी संपले व आता प्रतिक्षा अंतिम यादीकडे लागली आहे.

योगेश पांडे/ऑनलाइन लोकमत नागपूर, दि. 15 -  भारतीय जनता पक्षाच्या मुलाखतींचे सत्र शनिवारी संपले व आता प्रतिक्षा अंतिम यादीकडे लागली आहे. इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे तब्बल ९ दिवस मुलाखती चालल्या. मात्र अनेकांची मुलाखत केवळ एक औपचारिकताच ठरली. त्यांना नावाव्यतिरिक्त एकाही प्रश्नाची विचारणा करण्यात आली नाही. त्यामुळे आपला तिकीटासाठी विचार होणार की नाही, असा प्रश्न इच्छुक उमेदवारांना पडला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. एकूणच एक पल की  मुलाखतमुळे संबंधितांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.६ ते १४ जानेवारी या कालावधीत ३ हजार ३ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यात प्रस्थापित उमेदवारांसोबतच अनेक नवख्या इच्छुकांचादेखील समावेश होता. मुलाखतींच्या  पॅनल मध्ये विद्यमान खासदार, आमदार यांच्यासह माजी आमदार, शहर पदाधिकारी यांचा समावेश होता. प्रत्येक उमेदवाराचा अर्ज व त्याची माहिती मुलाखतकर्त्यांकडे अगोदरपासूनच होती.मुलाखतींदरम्यान साधारणत: उमेदवारांचे  व्हिजन  नवीन काम करण्याची क्षमता, विविध क्षेत्रांतील जनसंपर्क तसेच प्रभागाच्या विकासाची  ब्लू प्रिंट इत्यादींबाबत विचारणा करण्यात येत होती. जर उमेदवार नवीन असेल तर प्रभागाची ओळख, माहिती तेथील समस्या जाणून घेण्यात येत होत्या. पहिल्या दिवशीचा अनुभव ऐकून उमेदवारांनी जय्यत तयारीदेखील केली होती.मात्र काही उमेदवारांना मुलाखतकर्त्यांच्या परीक्षेला सामोरे जाण्याची वेळच आली नाही. मुलाखतीला गेल्यानंतर एकही प्रश्न न विचारता त्यांना पाठविण्यात आले. तर काही लोकांना केवळ नाव विचारुन ख्यालीखुशाली विचारण्यात आली, अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.प्रस्थापितांसोबत नवोदितांचादेखील समावेशएकही प्रश्न न विचारण्यात आलेल्या इच्छुकांमध्ये प्रस्थापितांसोबतच नवोदित उमेदवारांचादेखील समावेश आहे. आपले काम पक्षाला व पदाधिकाऱ्यांना माहितीच असल्याने प्रश्न विचारण्याची वेळच आली नाही. आपले काम  फत्ते  झाले, असा काही प्रस्थापितांचा समज आहे. मात्र आपले काम पक्षाला माहिती नसताना विचारणा झालीच नाही. मग आपले काम पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार कसे व उमेदवारीचा विचार होणार की नाही, असा प्रश्न नवोदितांना सतावतो आहे. लोकमत जवळ अनेकांनी आपल्या भावना बोलूनदेखील दाखविल्या.सर्वांना समान न्याय : कोहळेयासंदर्भात नागपूर शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काही प्रमाणात असे झाले असल्याचे मान्य केले. मुलाखतींना सामोऱ्या जाणाऱ्या अनेक इच्छुकांचे काम मुलाखत  पॅनल च्या सदस्यांना चांगल्याने ठावूक होते. त्यामुळे त्यांच्याकडे वेगळी विचारणा करण्याची आवश्यकताच नव्हती. मुलाखतींच्या मॅरेथॉन  सत्रात सर्व इच्छुकांना समान न्याय देण्यात आला असून पक्षाने ठरविलेल्या निकषांवर सर्वांची चाचपणी झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.