विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजपा विधी सेलकडून सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार

By योगेश पांडे | Published: May 6, 2024 10:32 PM2024-05-06T22:32:23+5:302024-05-06T22:33:54+5:30

त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विधी सेलतर्फे तक्रारीतून करण्यात आली आहे

Complaint filed by BJP legal cell against Vijay Vadettiwar in Sitabardi police station | विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजपा विधी सेलकडून सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार

विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजपा विधी सेलकडून सिताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शहीद आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून भाजपच्या विधी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात पोलीस तक्रार केली आहे. सिताबर्डी पोलीस ठाण्यात ही तक्रार करण्यात आली.

भाजपच्या विधी सेलचे महानगर अध्यक्ष ॲड.परीक्षित गजानन मोहिते यांनी ही तक्रार केली. तक्रारीनुसार वडेट्टीवार यांनी करकरे यांच्या मृत्यूमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता. भाजप व भाजपचे उमेदवार उज्वल निकम देशद्रोही असल्याचा आरोपदेखील वडेट्टीवार यांनी केला. वडेट्टीवार यांनी असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केला असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. विजय वडेट्टीवार यांचे वक्तव्य तथ्यहीन असून न्यायालयाचादेखी अवमान करणारे आहे अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आली. वडेट्टीवार यांनी केलेले आरोपी राजकीयदृष्ट्या प्रेरित असून पोलीस यंत्रणेच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विधी सेलतर्फे तक्रारीतून करण्यात आली आहे.

Web Title: Complaint filed by BJP legal cell against Vijay Vadettiwar in Sitabardi police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.