शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

लोणे समिती अहवालाविरुद्धची तक्रार तीन वर्षांपासून प्रलंबित

By admin | Updated: July 10, 2015 02:38 IST

निवृत्त न्यायमूर्ती जी.जी. लोणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेला रोस्टर घोटाळ्याचा चौकशी अहवाल रद्द ...

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : नागपूर विद्यापीठातील रोस्टर घोटाळानागपूर : निवृत्त न्यायमूर्ती जी.जी. लोणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सादर केलेला रोस्टर घोटाळ्याचा चौकशी अहवाल रद्द करण्याची तक्रार मुंबई येथील महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती आयोगात गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, नागपूर विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने ११ मे २०१२ रोजी ही तक्रार दाखल केली होती. आयोगाने तक्रारीची दखल घेऊन विद्यापीठाला नोटीस बजावली.यानंतर विद्यापीठाने २ आॅगस्ट २०१३ रोजी उत्तर सादर केले. ही तक्रार अद्याप प्रलंबित आहे. लोणे समितीने २० जून २००९ रोजी अहवाल सादर केला होता. अहवालात मंचलवार नामक व्यक्तीने रोस्टरमध्ये विशिष्ट सुधारणा केल्याचे व त्या सुधारणांमुळे आरक्षण निकषाला काही बाधा पोहोचली काय, याचा विद्यापीठाने स्वतंत्रपणे तपास करण्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठाने जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे उपकुलसचिव आर.जे. वळवी यांची चौकशीकरिता नियुक्ती केली होती. वळवी यांनी २९ मार्च २०११ रोजी अहवाल सादर केला. यानंतर लोणे समितीच्या अहवालालाच आयोगात आव्हान देण्यात आले. २००२ ते २००८ या कालावधीत राखीव प्रवर्गातील ५०६ नियुक्त्यांमध्ये झालेला गैरप्रकार ‘रोस्टर घोटाळा’ म्हणून ओळखला जातो. घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी प्रा. सुनील मिश्रा यांनी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. विद्यापीठाने याचिकेतील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विद्यापीठ घोटाळ्याच्या तपासाला पूर्ण सहकार्य करीत असून, पोलिसांना वेळोवेळी आवश्यक ती माहिती पुरविण्यात येत आहे. याचिकेतील आरोपांचा लोणे समितीच्या अहवालातील माहितीशी काहीच ताळमेळ नाही. सर्व आरोप आधारहीन आहेत. ३ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या बैठकीत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने वरिष्ठ सदस्य डॉ. डी.के. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती याचिकाकर्त्याच्या तक्रारींचे निराकरण करेल, असे विद्यापीठाने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. विद्यापीठ कुलसचिवांच्यावतीने उपकुलसचिव (बी.सी. सेल) रमण मदने यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले.(प्रतिनिधी)