दरोडेखोरांच्या टोळीत महाविद्यालयीन तरुण

By Admin | Updated: May 9, 2014 02:28 IST2014-05-09T02:28:22+5:302014-05-09T02:28:22+5:30

दरोडेखोरांच्या आंतरराज्यीय टोळीत सहभाग असल्याच्या आरोपावरून गुन्हे शाखेने धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे.

College youth in a group of robbers | दरोडेखोरांच्या टोळीत महाविद्यालयीन तरुण

दरोडेखोरांच्या टोळीत महाविद्यालयीन तरुण

नागपूर : दरोडेखोरांच्या आंतरराज्यीय टोळीत सहभाग असल्याच्या आरोपावरून गुन्हे शाखेने धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला अटक केली आहे.
प्रकाश सुरेंद्र पारधी (१९) रा. इंदिरा मातानगर, हिंगणा मार्ग असे आरोपीचे नाव आहे. एक आठवड्यापूर्वी भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरोली येथे दरोड्याची घटना घडली होती. या प्रकरणात आंधळगाव पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींकडून दरोड्याच्या घटनेत प्रकाश पारधीचा सहभाग उघड झाला. पण त्यानंतर प्रकाश पोलिसांच्या हाती लागला नव्हता. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विनोद चौधरी यांनी प्रकाशला अटक करून त्याच्याकडून तलवार जप्त केली. प्रकाशने गुन्हा कबूल केला आहे. दरोड्याच्या वेळी त्याच्यासोबत स्थानिक गुन्हेगार प्रदीप वर्मा व त्याचा भाऊ अमित वर्मा होते. ४0 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात एमआयडीसी पोलीस अमितचा दोन वर्षांपासून शोध घेत आहेत. प्रकाशने दरोड्यासाठी रायसोनी महाविद्यालयातून एक नवीकोरी दुचाकी चोरली होती. आंधळगाव पोलिसांनी ती जप्त केली आहे. प्रकाश धरमपेठ विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तणूक केली होती. पोलिसांनी त्याला अटकही केली होती. या टोळीने शहरात अनेक दरोडे घातले असावेत, असा संशय आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: College youth in a group of robbers