शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

देखभालअभावी कोचला सोडून गेले रेल्वे इंजिन

By admin | Updated: June 4, 2017 01:55 IST

रेल्वेगाडीच्या कोचला सोडून इंजिन पुढे गेल्याची घटना मागील आठवड्यात दोन वेळा घडली आहे.

हावडा मेल घटनेचा अहवाल दपूम रेल्वेला सोपविलालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाडीच्या कोचला सोडून इंजिन पुढे गेल्याची घटना मागील आठवड्यात दोन वेळा घडली आहे. तज्ज्ञांच्या मते याचे मुख्य कारण इंजिनची योग्य देखभाल न करणे हे आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात पडत आहे. मागील काही दिवसांपूर्वी बल्लारशाजवळ राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन कोचला सोडून पुढे गेले होते. अशीच घटना शुक्रवारी हावडा मेलबाबत घडली. सालवा-चाचेर जवळ घडलेल्या या घटनेत अचानक मोठा आवाज होऊन रेल्वेगाडीचे कोच आणि इंजिनच्या मधील कपलिंग तुटले. त्यामुळे इंजिन पुढे निघून गेले आणि कोच मागे राहिले. त्यानंतर नवी कपलिंग लावून इंजिन कोचला जोडून गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार हावडा मेलचे इंजिन दक्षिण पूर्व रेल्वेच्या संतरागाछी लोको शेडमधील होते. या इंजिनची योग्य देखभाल न केल्यामुळे कपलिंग तुटल्याची घटना घडली असावी असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या घटनेबाबत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, ही गंभीर घटना आहे. विभागातील सालवा-चाचेर येथे ही घटना घडली. या घटनेचा विभागीय स्तरावर प्राथमिक तपास करण्यात आला आहे. तपासात कपलिंग आणि इंजिनमध्ये त्रुटी असल्याची माहिती पुढे आली आहे. इंजिन संतरागाछी लोको शेडमधील असल्यामुळे तुटलेली कपलिंग, विभागीय तपासणीचा अहवाल दक्षिण पूर्व रेल्वेला सोपविण्यात आला आहे. आता या घटनेचे विश्लेषण करून दोषींचा शोध घेऊन त्यांना शिक्षा देण्याची जबाबदारी दक्षिण पूर्व रेल्वेची असल्याचे त्यांनी सांगितले. दपूम रेल्वेच्या कार्यपद्धतीवर शंकातज्ज्ञांच्या मते रेल्वे बोर्डाचा नियम आहे की कोणत्याही गाडीचा प्रवास ३०० ते ३५० किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर सुविधा असलेल्या रेल्वेस्थानकावर त्या गाडीचे ‘इन रुट एक्झामिनिशन’ करण्यात यावे. या नियमानुसार अपघात घडलेली हावडा मेलची यांत्रिक तपासणी रायपूर आणि बिलासपूर स्थानकावर व्हावयास हवी होती. रायपूरला गाडी १० मिनिट आणि बिलासपूरला १५ मिनिट थांबते. जर तेथे योग्यरीत्या यांत्रिक तपासणी केली असती तर कपलिंगची त्रुटी आढळून त्याची दुरुस्ती केल्या जाऊ शकली असती.