शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

नागपुरात बोगस पोलीस कर्मचाऱ्याला नागरिकांनी झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 10:06 PM

पोलीस कर्मचारी बनून ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या नावावर हप्ता वसुली करणाऱ्या बोगस पोलीस कर्मचाऱ्यास नागरिकांनी चोप दिला. ही घटना मंगळवारी रात्री जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत घडली.

ठळक मुद्देड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हची कारवाई न करण्याच्या मोबदल्यात मागितले होते पाच हजार रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलीस कर्मचारी बनून ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्हच्या नावावर हप्ता वसुली करणाऱ्या बोगस पोलीस कर्मचाऱ्यास नागरिकांनी चोप दिला. ही घटना मंगळवारी रात्री जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत घडली.प्रशांत युवराज बांबोर्डे (२६) रा. विश्वासनगर असे आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार राहुल बागडे फरार आहे. भंडारा येथील फिर्यादी २६ वर्षीय रोहित श्यामसुंदर हा रात्री ७.३० वाजता बाईकने नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जात होता. त्याला रस्त्यात आरोपींनी रोखले. गाडीचे दस्तावेज मागितले. नंतर दारु पिऊन गाडी चालवित असल्याचा आरोप करीत कारवाई करण्याची धमकी दिली. त्याला जरीपटका पोलीस ठाणे किंवा वाहतूक विभागाच्या कार्यालयात चलण्यास सांगितले. कारवाई न करण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपये मागितले. आरोपी स्वत: दारूच्या नशेत होते.रोहितला याची कल्पना येताच त्याने वाद न घालता सोडून देण्याची विनंती केली. यावर आरोपीने त्याला थापड मारली. रोहितने आपल्या भावाला फोन करून बोलाविले. त्याचा भाऊ लगेच घटनास्थळी पोहोचला. भावालाही आरोपी दारूच्या नशेत असल्याचे दिसून आले. या दरम्यान लोकांची गर्दी झाली. रोहितच्या भावाने आरोपीला त्यांचे ओळखपत्र मागितले. आरोपी एकमेकांकडे पाहू लागले. लोकांची गर्दी पाहून पळायला लागले. परंतु लोकांनी प्रशांतला पकडले आणि त्याची धुलाई केली. रोहितने जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रशांत बांबोर्डेला अटक केली. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. तो राहुलसोबत प्रॉपर्टी डीलिंगचे काम करीत होता. दोघांना दारू पिण्यासाठी पैशाची गरज होती. त्यामुळे ते पोलीस कर्मचारी बनून हप्ता वसुली करीत होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस