जीर्ण इमारत :

By Admin | Updated: May 12, 2014 01:02 IST2014-05-12T01:02:39+5:302014-05-12T01:02:39+5:30

उमरेड शहरातील जुन्या बसस्थानकाजवळील कन्नमवार शॉपिंग कॉम्प्लेक्सची इमारत जीर्ण झाल्याने खचू लागली आहे.

Chronic building: | जीर्ण इमारत :

जीर्ण इमारत :

 उमरेड शहरातील जुन्या बसस्थानकाजवळील कन्नमवार शॉपिंग कॉम्प्लेक्सची इमारत जीर्ण झाल्याने खचू लागली आहे. गाळेधारकांनी १९ आॅगस्ट २०१३ ला स्थानिक नगर परिषदेला निवेदन देऊन या बाबत माहिती दिली होती. परंतु, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे या इमारतीचा काही भाग खचला आहे. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. तब्बल दीड वर्षानंतर नगर परिषद प्रशासनाला जाग आली आणि गाळेधारकांना नोटीस पाठवून दुकानासमोरील शेड काढण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Chronic building: