शहरं
Join us  
Trending Stories
1
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
2
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
3
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
4
हे दशक आपत्तींचे; गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा 
5
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
6
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
7
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
8
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
9
टीईटी पेपरफुटी प्रकरण ‘तारीख पे तारीख’मध्ये अडकले; सर्व आरोपी आता जामिनावरही सुटले 
10
हवामान बदलामुळे भारतासह जगभरातील नद्यांतील ऑक्सिजनच्या प्रमाणात वेगाने घट
11
धर्मादाय आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतर टाटा ट्रस्टची महत्त्वाची बैठक स्थगित
12
एक विधान अन् इस्रायल, यूएई गुप्त मैत्रीचा पर्दाफाश!
13
आम्ही दोघेच जगाचे महान नेते; दौरा ऐतिहासिक म्हणत ट्रम्प यांनी जिनपिंग भेटीचे ‘जी-२’ असे केले नामकरण
14
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
15
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
16
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
17
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
18
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
19
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
20
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

बच्चे कंपनीला लागले ‘कार्टुन’चे फॅड

By admin | Updated: May 19, 2014 00:53 IST

घरातील टीव्हीवर बातम्या, सास-बहूच्या सिरियल्स, चित्रपट पाहण्यात मोठी मंडळी व्यस्त असताना बच्चे कंपनी मात्र कार्टून पाहण्याचा हट्ट करतात. कार्टून चॅनल लावून दिले नाही

 प्रत्येक घरातील चित्र : आता पालकांनीच काळजी घेण्याची गरज

नागपूर : घरातील टीव्हीवर बातम्या, सास-बहूच्या सिरियल्स, चित्रपट पाहण्यात मोठी मंडळी व्यस्त असताना बच्चे कंपनी मात्र कार्टून पाहण्याचा हट्ट करतात. कार्टून चॅनल लावून दिले नाही तर मुले घर डोक्यावर घेतात. त्यामुळे कार्टून चॅनल लावून देण्याशिवाय पर्याय उरत नाही. बहुतांश लोकांच्या घरातील हे चित्र आहे. अशा या कार्टुनच्या विश्वात मुले तासन्तास रमतात, मात्र याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असल्याने पालकांनी त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. टीव्हीसमोर बसून कार्टुन पहाणे लहान मुलांच्या आवडीची बाब होत चालली आहे. कार्टून पाहण्यासाठी मुले हट्टही करतात. मुलांनी शांत बसावे यासाठी त्यांना टीव्हीवर कार्टून चॅनल लावून दिले जाते. ५ वर्षांपासून ते १५ वर्षांर्यंतची मुले टीव्हीवर कार्टून पाहणे अधिक पसंत करतात. दिवसातील एक-दोन तास चांगल्या गुणवत्तेचे कार्यक्रम मुलांनी टीव्हीवर पहायला पाहिजे, मात्र मुलांना टीव्हीवरील कार्टून्स चॅनल्सचे अधिक आकर्षण असल्याने ती अधिकाधिक वेळ ते पाहण्यात घालवितात. शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. मुले आपला अधिकाधिक वेळ टीव्हीवर कार्टून पाहण्यासाठी घालविण्यावर भर देतात. त्यातच मुलांनी घराबाहेर पडू नये यासाठी त्यांना टीव्हीवर कार्टून पाहण्यास पालक संमती देतात. एखाद्या मित्राच्या घरी ग्रुपने कार्टून चॅनल पाहण्यात मुले दंग होतात, मात्र किती वेळ टीव्ही पहावा यासाठी त्यांना अनेक वेळा काहीही बोलले जात नाही. यातून मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने पालकांनी त्याकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आजारांना निमंत्रण तासन्तास कार्टून पाहण्यासाठी मुले टीव्हीच्या स्क्रिनवर एकटक पाहतात. त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यातून डोळ्यातून पाणी येणे, लाल होणे, खाज येणे, असा त्रास सुरू होतो. त्याचप्रमाणे कमी उजेडात टीव्ही पाहिल्यानेही डोळ्यांवर ताण पडतो. त्यातून नेत्रासंबंधी दोष उद्भवू शकतात. कमी वयात चष्मा लागण्याची शक्यता निर्माण होते. दुपारच्या वेळी उन्हात बाहेर न पडता टीव्हीवर कार्टून पाहण्यास प्राधान्य दिले पाहिजे, मात्र त्यासाठी मुलांना अधिक वेळ देण्याचे टाळलेही पाहिजे. तसेच त्यानी टीव्हीच्या स्क्रिनपासून योग्य अंतरावर बसले पाहिजे. अधिक वेळ टीव्ही पाहण्यामुळे मुलांचे वजन वाढण्याची शक्यता असते. त्यातही कमरेचा आकार वाढण्याची शक्यता अधिक असते. याचे परिणाम दीर्घ कालावधीनंतर समोर येत असतात. त्यामुळे मुलांनी सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत मैदानी खेळ खेळण्यास पसंती दिली पाहिजे. बौद्धिक विकासाला चालना देणारे खेळ खेळण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. मुले स्वत:हून कमी वेळ टीव्ही पाहतील यासाठी पालकांनी त्यांना त्याबाबत माहिती दिली पाहिजे. कमी वयात चष्मा सकाळ, दुपार, संध्याकाळ बहुसंख्य मुले टीव्हीला चिकटून असतात. तासन्तास कार्टून पाहतात. याचा सर्वात जास्त परिणाम डोळ्यांवर पडतो. यामुळे कमी वयात चष्मा लागणे, डोळ्यांच्या विविध समस्या उद्भवतात. (प्रतिनिधी)