शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
4
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
5
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
6
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
7
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
8
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
9
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
10
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
11
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
12
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
13
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
14
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
15
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
16
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
17
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
18
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
19
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
20
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
Daily Top 2Weekly Top 5

बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मुलावर हल्ला

By admin | Updated: April 27, 2016 03:00 IST

बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मृताच्या मुलाने आरोपीच्या मुलावर प्राणघातक हल्ला चढवला.

खून का बदला खून : धंतोलीत थरार नागपूर : बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मृताच्या मुलाने आरोपीच्या मुलावर प्राणघातक हल्ला चढवला. ही थरारक घटना सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास धंतोलीत घडली. यात सौरभ संजय अलोणे (वय २०) गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी लगेच धावपळ करून सहा आरोपींच्या मुसक्या बांधल्या. अमन जीवन खरे (वय २२, रा. रामबाग), निकुंज कमलाकर मेश्राम (वय २६, रा. दाभा वाडी) तसेच त्यांचे तीन अल्पवयीन साथीदार यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. या हल्ल्याचा मुख्य आरोपी बादल राजू गजभिये (वय २५) आहे. तो रामबागमध्ये राहतो. गेल्या वर्षी आरोपी संजय अलोणे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने बादलचे वडील राजू गजभिये याची हत्या केली होती. त्यामुळे बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बादलने संजयच्या मुलाची हत्या करण्याचा कट रचला. त्यानुसार ८ ते ९ साथीदारांना गोळा करून सोमवारी रात्री ९.३० पासून बादल सौरभच्या मागे लागला. चुनाभट्टी परिसरात सौरभ एकटा मिळताच बादल आणि त्याच्या साथीदारांनी तलवारीचे घाव घालून आणि दगडाने ठेचून सौरभची हत्या करण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूची मंडळी धावल्यामुळे आरोपी पळून गेले. गंभीर अवस्थेत सौरभला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्याची आई अनिता संजय अलोणे (वय ३५, रा. कौशल्या नगर) यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)मुख्य आरोपी फरारप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत उपायुक्त ईशू सिंधू, सहायक आयुक्त आर.आर. कापगते, गुन्हेशाखेचे निलेश राऊत, धंतोलीचे ठाणेदार राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक के. एन. गड्डीमे, गुन्हेशाखेचे श्री सानप, सुदाम मुंडे, श्रीनिवास मिश्रा, राजकुमार देशमुख, हवालदार महादेव थोटे, भय्याजी डेहनकर, अफसर खान पठाण, लक्ष्मण शेंडे, सुनील चौधरी, राजेंद्र सेंगर, अमीत पात्रे, प्रकाश ताकवत, प्रवीण ठाकूर, विशाल ठाकूर यांनी तत्परतेने चौकशी करून आरोपी अमन जीवन खरे, निकुंज कमलाकर मेश्राम तसेच त्यांचे तीन अल्पवयीन साथीदार यांना अटक केली. जखमी सौरभ संजय अलोणे याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर मेडिकल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. मुख्य आरोपी बादल गजभियेसह फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.