दिल्ली मेट्रो कार्यालयास भेट : अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चानागपूर : मुंबई, नागपूरसह राज्यातील इतर शहरांत मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणावर उभारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. उपराजधानीत उभारण्यात येणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही भेट महत्त्वपूर्ण समजली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दिल्ली मेट्रो रेल कॉपोर्रेशनच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. यावेळी दिल्ली मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक मँग्यू सिंग यांनी सहकार्याची तयारी दाखविली. सिंग आणि कार्यकारी संचालक शर्मा यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोच्या प्रगतीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. देशांतर्गत आणि देशाबाहेरही दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशन आपला कार्यविस्तार मोठ्या प्रमाणात करीत आहे. दिल्ली शहरात मेट्रोने दररोज २५ लाख नागरिक प्रवास करतात. विविध टप्प्यात सुमारे २०० कि.मी. लांबीचे जाळे मेट्रोने तयार केले आहे. प्रवास सुखकर आणि गतिमान करणाऱ्या मेट्रोमुळे आपण प्रभावित झालो आहे. दिल्ली मेट्रोप्रमाणे मुंबईतही मेट्रोचे जाळे कसे उभारता येईल, याबद्दल विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये मेट्रोचे जलद जाळे उभारण्याच्या दृष्टीने दिल्ली मेट्रोला मोठा वाव आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक सुधारण्यासाठी रस्त्यांबरोबरच रेल्वे व्यवस्था सक्षम करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. नागपूर व पुणे शहरातील मेट्रो रेल्वे हा त्याचाच एक भाग आहे. मुंबईकरांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच त्यांचा दैनंदिन प्रवास आरामदायक आणि परवडणारा होण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. दिल्ली मेट्रोचे पथक याच महिन्यात मुंबई मेट्रोची पाहणी करण्यासाठी मुंबईला भेट देणार आहे.(प्रतिनिधी)
नागपूर मेट्रो रेल्वेसाठी मुख्यमंत्री दिल्लीत
By admin | Updated: June 10, 2015 03:03 IST
मुंबई, नागपूरसह राज्यातील इतर शहरांत मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणावर उभारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन ...
नागपूर मेट्रो रेल्वेसाठी मुख्यमंत्री दिल्लीत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}