शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रसायनयुक्त पाणी नदीत

By admin | Updated: November 18, 2016 03:09 IST

स्थानिक औद्योगिक वसाहतीत असलेल्या इंडोरामा कंपनीतील रसायनयुक्त पाणी परिसरातील वेणा आणि कृष्णा नदीत सोडण्यात आल्याने

नागरिकांचे आरोग्य धोक्यात : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारबुटीबोरी : स्थानिक औद्योगिक वसाहतीत असलेल्या इंडोरामा कंपनीतील रसायनयुक्त पाणी परिसरातील वेणा आणि कृष्णा नदीत सोडण्यात आल्याने बुटीबोरी व टाकळघाट येथील नागरिक तसेच नदीच्या पात्रातील जलचर प्राण्यांच्या जीवितास धोका उद्भवण्याची शक्यता बळावली आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे तक्रार केली आहे. बुटीबोरी व टाकळघाट या दोन्ही गावांना वेणा आणि कृष्णा नदीच्या पात्रातून पाणीपुरवठा केला जातो. या दोन्ही नदीच्या पात्रात इंडोरामा कंपनीतील रसायनयुक्त पाणी सोडण्यात आल्याने, या दोन्ही गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, या गावांमधील नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे रीतसर तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत प्रदूषण मंडळाच्या सदस्यांनी या प्रकाराची प्रत्यक्ष पाहणी केली.दरम्यान, प्रदूषण मंडळाचे अधिकारी लोहळकर यांनी या पाण्याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि पाण्याचे नमुने घेतले. सदर नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे लोहळकर यांनी सांगितले. सदर रसायनयुक्त पाणी नदीच्या पात्रांत सोडणे बंद करावे, अशी सूचना प्रदूषण मंडळाच्या सदस्यांनी कंपनी व्यवस्थापनाला केली होती. परंतु दुसऱ्या दिवशीही विशेष म्हणजे, रसायनयुक्त पाणी पात्रात सोडणे सुरू असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी या प्रकाराबाबत एमआयडीसी बुटीबोरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत पोलीस निरीक्षक वैरागडे यांनी एमआयडीसीचे उपअभियंता राय व व्यास यांना बोलावून त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. या अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी रसायनयुक्त पाणी सोडले जाते, त्या ठिकाणाची पाहणी करून पंचनामा केला आणि इंडोरामा कंपनी व्यवस्थापनावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. असाच प्रकार यापूर्वीही घडला होता. त्यावेळी प्रदूषण मंडळाने या कंपनीवर दंड ठोठावला होता. (प्रतिनिधी)